Join us  

चेहऱ्यावर झटपट ग्लो हवा तर घरीच करा १ सोपा उपाय; येईल चेहऱ्यावर ग्लो-दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 11:04 AM

Home Made Instant Glowing Skin Face Mask : पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस करण्यापेक्षा चेहरा उजळवण्यासाठी नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा...

एखादा लहानसा कार्यक्रम असला किंवा विकेंडला कुठे बाहेर जायचं असलं की आपण छान दिसावं असं प्रत्येकीला वाटतं. यातही चेहऱ्याचे सौंदर्य सगळ्यात महत्त्वाचे असल्याने चेहरा नितळ, सतेज असावा अशी आपली इच्छा असते. पण कधी चेहऱ्यावर खूप डाग पडतात तर कधी सुरकुत्या पडल्याने चेहरा वयस्कर दिसतो. काही वेळा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढतात तर कधी आणखी काही. चेहऱ्यावर फोड आणि पिंपल्स येणे ही तर अतिशय सामान्य गोष्ट आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा टॅन होण्याचे प्रमाणही जास्त असते. पोट साफ नसणे, प्रदूषण, ताण, सौंदर्यप्रसाधनांचा वापर यांसारख्या गोष्टींमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात (Home Made Instant Glowing Skin Face Mask). 

अशावेळी एकतर आपण सौंदर्यप्रसाधने वापरुन हे घालवण्याचा प्रयत्न करतो नाहीतर मेकअप करुन ते लपवतो. शक्य असेल तेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटसही घेतो. मात्र यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन काही सोपे उपाय केल्यास त्याचाही चेहरा नितळ होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. इन्स्टाग्रामवरील एका पेजवर झटपट चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी एक सोपा उपाय शेअर करण्यात आला आहे. हा उपाय आपण फेस मास्क म्हणूनही वापरु शकतो आणि टॅनिंग घालवण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो आणि स्क्रब म्हणूनही हा उपाय वापरता येतो. असा हा उपाय कोणता आणि तो नेमका कसा करायचा पाहूया...

(Image : Google)

१. एका लहानशा कढईत १ चमचा हळद घेऊन ती चांगली भाजून घ्यायची. लालसर रंग येईपर्यंत भाजल्यानंतर गॅस बंद करायचा. 

२. ही भाजलेली हळद एका वाटीत काढून घ्यायची आणि त्यामध्ये १ चमचा दूध आणि १ चमचा मध घालायचा. 

३. हे मिश्रण चांगले एकत्र करुन फेस पॅक लावतो त्याप्रमाणे चेहऱ्यावर सगळीकडे एकसारखे लावायचे. 

 

४. साधारण १० ते १२ मिनीटे हा पॅक चेहऱ्यावर तसाच ठेवून नंतर चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा. 

५. हे तिन्ही पदार्थ चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याने हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरीही चालतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी