Join us  

दिवाळीसाठी घराची साफसफाई करुन, भांडी घासून हात खरखरीत झाले? ३ उपाय, हात होतील मऊ- मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 4:24 PM

Home Remedies For Dry Palms: दिवाळीत घर चकाचक करत असताना हातांकडे मात्र पुरतं दुर्लक्ष होत आहे ना? म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा..(how to make our hands soft?)

ठळक मुद्देआता इथून पुढे तुमची घरातल्या स्वच्छतेची जी काही कामं राहिली आहेत, ती कामं करण्यासाठी हॅण्ड ग्लोव्ह्जचा वापर कटाक्षाने करा.

दिवाळीत अख्ख्या घराची स्वच्छता करण्यात सध्या घरोघरीच्या महिला गुंतून गेल्या आहेत. पुरुषमंडळी, लहान मुलं आणि घरातल्या इतर व्यक्तीही या कामात मदत करतात. पण खरी मेहनत असते ती घरातल्या कर्त्या बाईची. सगळ्या घराचा प्रत्येक कोपरा अगदी स्वच्छ- चकाचक केला जातो. कित्येक भांडी घासली जातात. कपाटातले कित्येक कपडे धुवून वाळवले जातात. हे सगळं करत असताना हात मात्र पार थकून जातात. काही दिवसांपुर्वी मऊ- मुलायम असणारे हात दिवाळीच्या या स्वच्छता अभियानामुळे पार खरखरीत होऊन जातात (how to make our hands soft?). तुमच्या हातांचीही अशीच अवस्था झाली असेल तर हातांना पुन्हा पुर्वीची कोमलता आणण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा...(Home Remedies For Dry Palms)

 

हात खरखरीत झाले असल्यास उपाय...

१. आता इथून पुढे तुमची घरातल्या स्वच्छतेची जी काही कामं राहिली आहेत, ती कामं करण्यासाठी हॅण्ड ग्लोव्ह्जचा वापर कटाक्षाने करा.

डोक्यावर नवे केस उगवायला सुरुवात होईल! 'हे' खास तेल लावा, केस गळणं बंद होऊन जाईल

हातमोजे घालून काम करताना खूप अवघडल्यासारखं होतं. काही काम सुचत नाही, असा अनेकींचा अनुभव आहे. पण असं असलं तरी ग्लोव्ह्ज घालूनच काम करा. त्यामुळे हातांना बऱ्यापैकी संरक्षण मिळते.

 

२. दररोज रात्री झोपण्यापुर्वी एका टबमध्ये थोडं गरम पाणी करा. त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाका. रॉक सॉल्ट तुमच्याकडे असेल तर आणखी चांगलं. पण जर ते नसेल तर आपलं नेहमीचं साधं मीठ टाकलं तरी चालेल.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

या पाण्यात काही मिनिटांसाठी हात बुडवून ठेवा. त्यानंतर हात पुसून कोरडे करून घ्या आणि खोबरेल तेलाने हातांना मसाज करा. यामुळे हातांचा थकवा कमी होण्यासही मदत होईल. शिवाय हातांना मऊपणा येईल.

 

३. काम करून करून हात काळवंडले असतील तर हा एक उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडं कच्चं दूध घ्या.

रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी वाढेल भराभर

त्यामध्ये १ टीस्पून पिठीसाखर आणि १ टीस्पून कॉफी पावडर टाका. हे मिश्रण हातावर घ्या आणि त्याने हातांना मसाज करा. हातांचं टॅनिंग, काळवंडलेपण कमी होऊन जाईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीदिवाळी 2024स्वच्छता टिप्सहोम रेमेडी