Lokmat Sakhi >Beauty > लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय...

लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय...

Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair : How to make Hibiscus Conditioner for Hair Growth : जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वापर करतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 06:29 PM2024-07-11T18:29:53+5:302024-07-11T18:39:30+5:30

Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair : How to make Hibiscus Conditioner for Hair Growth : जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वापर करतात.

Home made natural Hibiscus flower conditioner Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair How to make Hibiscus Conditioner for Hair Growth | लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय...

लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय...

बहुतेक लोकांच्या घराच्या अंगणामध्ये जास्वंदाच्या फुलाचे झाड असते. केसांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जास्वंदाचे फुल सर्वोत्तम औषधी वनस्पतींपैकी एक मानले जाते. या सुंदर आणि तेजस्वी फुलामध्ये इतके गुणधर्म आहेत की तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्या दूर ठेवण्याची क्षमता या फुलात आहे.जास्वंदाच्या फुलामध्ये बरेच औषधी घटक असतात. जास्वंदाचे फुल (Use Hibiscus For Healthy Hair) आपल्या केसांच्या आरोग्याचे पोषण करू शकते. जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वापर करतात. जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटीफंगल गुणधर्म हे केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून फायदेशीर मानले जाते.

केसांमधील कोंडा घालवण्यासाठी, केस गळणं थांबवण्यासाठी, केस दाट होण्यासाठी, केसांना कंडिशनिंग करण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यासाठी जास्वंदीचं फुल खूपच फायदेशीर ठरतं. आपण आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा समावेश करून केसांची काळजी घेऊ शकता. आयुर्वेदात जास्वंदाचे फुल व पानं यांना फार महत्त्व आहे. तुम्ही यापासून घरच्या घरी अगदी सहज आयुर्वेदिक कंडिशनर तयार करू शकता. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास जास्वंदीच्या फुलाचे घरगुती कंडिशनर फायदेशीर ठरते. जास्वंदीच्या फुलाचे कंडिशनर घरच्या घरी कसे तयार करावे याची सोपी कृती पाहूयात(Home made natural Hibiscus flower conditioner)

साहित्य :- 

१. जास्वंदीची फुले - १५ ते २० फुले 
२. बदामाचे तेल - १ कप 
३. बायो एंजाईम्स - ३० मि. ली

पाठीवर मुरुम? अनेक उपाय करूनही कमी होत नाहीत, पाहा कारण आणि असरदार खास उपाय... 
 

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात जास्वंदीची फुले सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यावीत. 
२. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात ही जास्वंदीची फुले संपूर्ण रात्रभर भिजत ठेवावीत. 
३. दुसऱ्या दिवशी जास्वंदीच्या फुलांचा रंग या पाण्याला येऊन पाण्याचा रंग लाल झाला असेल. 
४. आता पाण्यात भिजवून घेतलेली जास्वंदीची फुले मिक्सरमधून बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावीत.

रात्री केस मोकळे सोडून झोपावे की वेणी घालणंच योग्य? केसांसाठी बेस्ट पर्याय कोणता, कशाने केस जातात बघा...

 
५. आता एका मोठ्या भांड्यात जास्वंदीच्या फुलांची पेस्ट काढून घ्यावी त्यात जास्वंदीची फुल भिजत ठेवलेले पाणी देखील मिस्क करावे. सगळ्यात शेवटी यात बदामाचे तेल देखील मिसळून घ्यावे. यात आपण प्रिझर्व्हेटिव्ह्ज व सुगंध येण्यासाठी ३० ml  बायो एंजाईम्स देखील घालू शकता.   
६. सगळ्यात शेवटी हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित हलवून एका हवाबंद बाटलीत भरुन ठेवावे. 

अशाप्रकारे आपण जास्वंदीच्या फुलांचा वापर करून घरच्याघरी झटपट नैसर्गिक कंडिशनर बनवू शकतो. कोणत्याही प्रकारचा शाम्पू लावल्यानंतर आपण या घरगुती कंडिशनरचा वापर करु शकता.

Web Title: Home made natural Hibiscus flower conditioner Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair How to make Hibiscus Conditioner for Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.