Join us  

डोक्यात पांढरे केस दिसू लागले? लगेचच 'हे' तेल लावा, वय झालं तरी केस राहतील काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 12:49 PM

Home Remedies For Gray Hair: डोक्यात पांढरे केस दिसायला सुरुवात झाली असेल तर लगेचच हा घरगुती उपाय करायला सुरुवात करा... (home made oil to keep hair black)

ठळक मुद्देया तेलामुळे बाकीचे केस पांढरे होणं तर बंद होईलच पण केसांना चांगलं पोषण मिळून त्यांची वाढही छान होईल.

पुर्वी वयस्कर माणसांचे केस पिकलेले दिसायचे. पण आता मात्र वय आणि केस पिकणं यांचा काहीही संबंध राहिलेला नाही. अगदी शाळकरी मुलांचेही केस सध्या पांढरे झालेले दिसत आहेत. तुमचेही केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल, डोक्यात अधून- मधून पांढरे केस चमकायला लागले असतील तर लगेचच हे एक घरगुती तेल लावायला सुरुवात करा ( how to get rid of black hair). या तेलामुळे बाकीचे केस पांढरे होणं तर बंद होईलच पण केसांना चांगलं पोषण मिळून त्यांची वाढही छान होईल (home remedies for gray hair). केस गळणं कमी होऊन ते दाट होतील. (home made oil to keep hair black)

 

केस पांढरे होऊ नयेत यासाठी घरगुती तेल

केस पांढरे होऊ नयेत यासाठी घरच्याघरी कशा पद्धतीने तेल तयार करायचं, याविषयीचा व्हिडिओ sarikazkitchen या इन्स्टाग्राम पेजवर तयार करण्यात आला आहे.

हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून मेथी दाणे, १ टेबलस्पून ओनियन सीड्स म्हणजेच कलौंजी, ६ ते ७ लवंग आणि २ टीस्पून शतावरी चुर्ण लागणार आहे.

बघा टॅनिंग घालविण्यासाठी कसा करायचा आंब्याचा उपयोग- उन्हामुळे रापलेला चेहरा चटकन उजळेल

सगळ्यात आधी तर मेथीदाणे, कलौंजी, लवंग आणि शतावरी चूर्ण हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या.

यानंतर एक लोखंडी तवा किंवा कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये १ कप खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल टाका.

 

या तेलामध्ये आता आपण तयार केलेली पावडर घाला आणि तेलाला उकळी येऊ द्या. तेल २ ते ३ मिनिटे मंद आचेवर उकळून घेतलं की गॅस बंद करा. हे तेल थंड झालं की गाळून एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. 

तमन्ना भाटियाच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट आहे 'हा' होममेड स्क्रब, डेडस्किन निघून त्वचा होईल मऊ

या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मसाज करा आणि त्यानंतर २ ते ३ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. किंवा रात्री तेल लावून दुसऱ्यादिवशी केस धुतले तरी चालेल. हे तेल नियमितपणे लावल्यास बाकीचे केस पांढरे होणार नाहीत, असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी