Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

How to Remove Tanning Quickly: हा एवढा एकच उपाय केला तरी दिवाळीपर्यंत त्वचेवरचं सगळं टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल....(Skin care tips for glowing skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 11:33 AM2023-10-31T11:33:53+5:302023-10-31T11:35:10+5:30

How to Remove Tanning Quickly: हा एवढा एकच उपाय केला तरी दिवाळीपर्यंत त्वचेवरचं सगळं टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल....(Skin care tips for glowing skin)

Home made scrub for glowing skin, How to remove tanning on skin quickly? 1 simple solution to get glowing skin in few days | दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

Highlightsदिवाळी येईपर्यंत हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा. बघा घर बसल्याच त्वचेवर कसा मस्त ग्लो येईल...

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये आपणही देखणं- सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळेच तर मग अनेकजणी दिवाळीचं औचित्य साधून पार्लरमध्ये चकरा मारतात. क्लिनअप, फेशियल, व्हॅक्सिंग हे तर करतातच. पण काही जणी संपूर्ण त्वचाच चमकदार व्हावी यासाठी बॉडी पॉलिशिंगही करून घेतात. आता तुम्हाला एवढं सगळं करायला वेळ नसेल किंवा त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करा (Home made scrub for glowing skin). दिवाळी येईपर्यंत हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा. बघा घर बसल्याच त्वचेवर कसा मस्त ग्लो येईल (1 simple solution to get glowing skin in few days)...

 

त्वचा चमकदार होण्यासाठी उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या kitchen_maan या पेजवर शेअर करण्यात आला असून त्यासाठी आपल्याला एक वाटीभरून संत्र्याची साले, एक वाटी भरून गुलाबाच्या पाकळ्या, २ टेबलस्पून हरबरा डाळीचं पीठ आणि १ टेबलस्पून हळद एवढं साहित्य लागणार आहे.

केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

सध्या बाजारात संत्री भरपूर प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे संत्री आणून त्याच्या साली एक दिवस उन्हात वाळवत ठेवा. तसेच गुलाबाच्या पाकळ्याही एक दिवस उन्हात ठेवून वाळवून घ्या.

दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी आकर्षक वस्तू घ्यायच्या? बघा २५० रुपयांहून कमी किंमतीत सुंदर पर्याय

संत्र्याच्या साली आणि गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या वाळल्या की त्या मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात हरबरा डाळीचं पीठ आणि हळदही घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या. हे झाले होममेड उटणे तयार. आता हे उटणे एका डब्यात भरून ठेवा आणि जसे लागेल तसे वापरायला काढा.

 

उटण्याचा वापर कसा करायचा?

आता २ टेबलस्पून उटणे एका वाटीत घ्या. त्यात एक टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून कच्चे दूध टाका. त्वचा ओलसर करून हे मिश्रण हात, पाय, पाठ, मान यांच्यावर चाेळून लावा. एखादा मिनिट चोळल्यावर धुवून टाका. 

कतरिना कैफने नेसलेली १९ हजारांची पिवळी साडी पाहताच आलिया भट म्हणाली.... वाचा व्हायरल पोस्ट

हे उटणे चेहऱ्याला लावताना मात्र खूप हळूवार हाताने मसाज करा. 

आंघोळ करताना दररोज साबणाऐवजी याच उटण्याचा वापर केला तर बघा दिवाळीपर्यंत त्वचेवरचं सगळं टॅनिंग निघून जाऊन त्वचा कशी मस्त चमकते ते.... 

 

Web Title: Home made scrub for glowing skin, How to remove tanning on skin quickly? 1 simple solution to get glowing skin in few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.