Lokmat Sakhi >Beauty > ना त्वचा टॅन होणार ना डेडस्किन वाढणार! अंघोळीच्या वेळी फक्त १ उपाय करा, त्वचा चमकेल

ना त्वचा टॅन होणार ना डेडस्किन वाढणार! अंघोळीच्या वेळी फक्त १ उपाय करा, त्वचा चमकेल

Best Scrub For Removing Tanning And Dead Skin: टॅनिंग होणं, डेड स्किन वाढणं असं सगळं त्वचेच्या बाबतीत नको असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करा... (how to make skin clear and glowing?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 03:20 PM2024-07-15T15:20:59+5:302024-07-15T15:21:42+5:30

Best Scrub For Removing Tanning And Dead Skin: टॅनिंग होणं, डेड स्किन वाढणं असं सगळं त्वचेच्या बाबतीत नको असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करा... (how to make skin clear and glowing?)

home made scrub for removing tanning and dead skin, how to get rid of dead skin and tanning, how to make skin clear and glowing | ना त्वचा टॅन होणार ना डेडस्किन वाढणार! अंघोळीच्या वेळी फक्त १ उपाय करा, त्वचा चमकेल

ना त्वचा टॅन होणार ना डेडस्किन वाढणार! अंघोळीच्या वेळी फक्त १ उपाय करा, त्वचा चमकेल

Highlightsडेड स्किन, टॅनिंग काढून टाकण्याचा हा एक अतिशय सोपा आणि स्वस्त उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला महागडं स्क्रब विकत घेण्याची कधीच गरज पडणार नाही. 

हल्ली आपल्यापैकी बऱ्याच जणांना दररोज उन्हात जाऊन काम करावं लागतं. दररोजच्या प्रवासात चेहऱ्यावर धूळ बसते. शिवाय याच्या बरोबरीला धूर आणि प्रदुषण तर आहेच. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचा लवकर टॅन होते. तसेच त्वचेवर डेड स्किनचं प्रमाण वाढतं. यासाठी मग वारंवार वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घ्याव्या लागतात. बऱ्याचदा आपल्याकडे तेवढाही वेळ नसतो (home made scrub for removing tanning and dead skin). किंवा मग त्यासाठी खूप जास्त पैसे घालविण्याची इच्छा नसते. म्हणूनच आता त्वचा टॅन होऊ नये किंवा तिच्यावर डेड स्किन वाढू नये यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय पाहून घ्या...(how to get rid of dead skin and tanning)

 

टॅनिंग, डेड स्किन काढून टाकण्यासाठी घरगुती बॉडी स्क्रब

त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन एकदम साध्या- सोप्या घरगुती उपायांनी कसं काढून टाकता येतं, याविषयीचा एक व्हिडिओ meghnasfoodmagic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

बघा आलिया भटने नेसलेली चांदीचे काठ- सोन्याची बुटी असणारी १६० वर्षे जुनी 'आशावाली' साडी.. 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ कप मसूर डाळ, अर्धा कप तांदूळ, २ टीस्पून हळद, ३ टेबलस्पून बेसन आणि ३ टेबलस्पून मुलतानी माती लागणार आहे. 

सगळ्यात आधी मसूर डाळ, तांदूळ मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर अतिशय बारीक नको. थोडी रवाळ असावी. आता ही पावडर एका भांड्यात काढा.

 

त्यामध्ये हळद, बेसन, मुलतानी माती टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. तुम्ही या मिश्रणात कॉफी पावडर देखील टाकू शकता. आता हे घरी तयार केलेलं स्क्रब एका डब्यात भरून ठेवा. हे तुम्ही पुढचे ३ महिने वापरू शकता.

आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा वापर

अंघोळीला जाताना हे स्क्रब एक- दोन चमचे घ्या. त्यामध्ये मध, दही, कच्चं दूध, गुलाब पाणी, लिंबाचा रस असं तुम्हाला सहजासहजी जे काही मिळेल ते त्यात टाका आणि त्या मिश्रणाने अंगाला मसाज करा. चेहऱ्याला हलक्या हाताने चोळा. त्वचेवरची डेड स्किन, टॅनिंग काढून टाकण्याचा हा एक अतिशय सोपा आणि स्वस्त उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला महागडं स्क्रब विकत घेण्याची कधीच गरज पडणार नाही. 


 

Web Title: home made scrub for removing tanning and dead skin, how to get rid of dead skin and tanning, how to make skin clear and glowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.