दिवसेंदिवस केसांच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत. प्रदुषण, आहारातील पोषणमुल्यांची कमतरता असे अनेक घटक यासाठी कारणीभूत आहेत. आहारातून योग्य पोषण मिळालं नाही, तर केसांची चांगली वाढ होत नाही. अपुऱ्या पोषणामुळे मग केस गळणे, अकाली पांढरे होणे (gray hair), केसांची वाढ खुंटणे अशा अनेक तक्रारी सुरू होतात. म्हणूनच केसांना योग्य पोषण देण्यासाठी हा एक होममेड स्प्रे वापरून पाहा (Home made spray for long and strong hair). यात वापरण्यात आलेल्या सगळ्याच वस्तू नैसर्गिक असून केसांसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे केसांची चांगली वाढ होईल (How to reduce hair loss).
केसांची वाढ होण्यासाठी स्प्रे कसा तयार करायचा?
केसांच्या वाढीसाठी घरगुती स्प्रे कसा तयार करायचा, याविषयीचा व्हिडिओ samasya_and_samadhan या इन्स्टाग्राम पेजवर तयार करण्यात आला आहे.
साहित्य
दिवाळीत सुंदर पारंपरिक हेअरस्टाइल करायची तर अंबाडा घालण्याचे बघा ७ ट्रेण्डी आणि सोपे प्रकार
१ टेबलस्पून मेथी दाणा
१ टेबलस्पून कलौंजी
अर्धा टेबलस्पून जवस
कोरफडीचं मध्यम आकाराचं पान
१ लहान आकाराचा कांदा
१ टेबलस्पून तांदूळ
दिड ग्लास पाणी
कृती
सगळ्यात आधी कोरफडीच्या पानाच्या बारीक फोडी करून घ्या..
तसेच कांदाही बारीक चिरून घ्या.
वापरून झालेले व्हॅक्स कॅण्डल फेकून देऊ नका... घर सजविण्यासाठी त्याचा 'असा' मस्त उपयोग करा
गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवा, त्यात दिड ग्लास पाणी घाला.
काेरफड, कांदा, मेथी दाणा, तांदूळ, जवस, कलौंजी असं सगळं त्या पाण्यात टाका.
पाण्याला ५ ते ७ मिनिटे चांगलं उकळून घ्या. यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झालं की एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
आठवड्यातून २ ते ३ वेळा हा स्प्रे केसांच्या मुळांशी मारावा. यामुळे केसांना उत्तम पोषण मिळतं आणि केसांची वाढ चांगली होते.