Lokmat Sakhi >Beauty > दोडक्याचा असाही भन्नाट उपयोग! पांढऱ्या केसांवर खास उत्तम उपाय, बघा केसांवर कशी जादू..

दोडक्याचा असाही भन्नाट उपयोग! पांढऱ्या केसांवर खास उत्तम उपाय, बघा केसांवर कशी जादू..

Home Remedies For Gray Hair: कमी वयात पांढरे केस होण्याचा त्रास अनेक जणांना छळतो. या समस्येवर केमिकल्स असणारे हेअर प्रोडक्ट्स (hair products) वापरण्यापेक्षा हा एक घरगुती उपाय (home remedies) करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 05:52 PM2022-09-22T17:52:24+5:302022-09-22T18:04:49+5:30

Home Remedies For Gray Hair: कमी वयात पांढरे केस होण्याचा त्रास अनेक जणांना छळतो. या समस्येवर केमिकल्स असणारे हेअर प्रोडक्ट्स (hair products) वापरण्यापेक्षा हा एक घरगुती उपाय (home remedies) करून बघा..

Home made toner for gray/ white hair, Use of Ridge Gourd or dodka for gray hair | दोडक्याचा असाही भन्नाट उपयोग! पांढऱ्या केसांवर खास उत्तम उपाय, बघा केसांवर कशी जादू..

दोडक्याचा असाही भन्नाट उपयोग! पांढऱ्या केसांवर खास उत्तम उपाय, बघा केसांवर कशी जादू..

Highlightsकेमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्ट वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून बघणं कधीही अधिक चांगलं.केस पांढरे होणं अगदी कमी होऊन जाईल.

पांढरे केस हे पुर्वी वार्धक्याचं लक्षण असायचं. पण आता पांढरे केस (gray hair) आणि वय यांचा काहीही संबंध उरलेला नाही. अगदी शाळकरी मुलांच्या डोक्यातही सहज पांढरे केस दिसून येतात. पण तरीही असं असलं तरी आपले केस पांढरे (white hair) होऊ लागले आहेत, हे पचवणं प्रत्येकासाठीच अतिशय जड असतं. आपण चटकन त्यावर काहीना काही उपाय करायला बघतो. पण अशा केसांवर केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्ट वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून बघणं कधीही अधिक चांगलं. त्यासाठीच हा उपाय (home remedies), केस पांढरे होणं अगदी कमी होऊन जाईल.(Use of Ridge Gourd or dodka for gray hair)

 

पांढऱ्या केसांसाठी घरगुती टोनर
beautyandhairsecrets या इन्स्टाग्राम पेजवर हा उपाय शेअर करण्यात आला आहे. स्वयंपाक घरातले दोडके (Ridge Gourd) आणि इतर काही पदार्थ वापरून टोनर कसे तयार करायचे, हे यात सांगितले आहे.

१००- १५० रुपयांत ब्रॅण्डेड लिपस्टिक! लिपस्टिक खरेदी करताना हे ६ पर्याय तुम्ही पहायलाच हवेत
कसं करायचं दोडक्याचं टोनर?
१. यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घ्या आणि ते गॅसवर तापायला ठेवा.

२. आता त्यात अर्धे दोडके आणि एक आवळा किसून टाका.

३. तसेच १ टीस्पून कलुंजी, कढीपत्त्याची १५ ते २० पाने, १ टीस्पून मेथी दाणे आणि १ टीस्पून चहा पावडर टाका.

४. हे मिश्रण १० ते १२ मिनिटे चांगले उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. 

 

कसे वापराचे टोनर?
१. स्प्रे बॉटलच्या मदतीने हे टोनर डोक्याच्या त्वचेवर शिंपडा.

गुलाबाची रोपं विकत आणताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, तरच तुमच्या बागेत टप्पोरे-सुंदर गुलाब उमलतील..

२. अडीच- तीन तास ते तसेच केसांवर राहू द्या.

३. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

४. अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हे टोनर वापरावे. एकदा टोनर तयार केले की आठवडाभर वापरता येते. 

 

Web Title: Home made toner for gray/ white hair, Use of Ridge Gourd or dodka for gray hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.