Join us  

कडधान्याचं उटणं! घरच्याघरी दिवाळीत तयार करा हे कडधान्याचं खास उटणं, मिळेल ब्रायडल ग्लो- चेहरा होईल सुंदर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 1:30 PM

Beauty Tips For Diwali Ubtan: दरवर्षी आपण विकतचं उटणं आणतोच. आता या दिवाळीला हे घरगुती, कडधान्यांपासून तयार केलेलं सात्विक उटणं लावून बघा.

ठळक मुद्देयंदाच्या दिवाळीत हे एक आणखी स्पेशल उटणं तयार करून बघा. कडधान्यापासून तयार करण्यात येणाऱ्या या उटण्याची कृती....

दिवाळीत अभ्यंग स्नानाची आणि स्नानाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या सुंगधी उटण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळेच खरंतर दिवाळीचा फिल यायला सुरुवात होते. उटण्यामुळे खरोखरच त्वचेवरची डेड स्किन निघून जाते आणि त्वचा आपली आपल्यालाच अधिक मऊ, तुकतुकीत (bridal glow) झाल्यासारखी जाणवते. उटणं लावून त्वचेवर जो परिणाम दिसून येतो, तो परिणाम एखाद्या नामांकित साबणामुळेही जाणवत नाही. म्हणूनच यंदाच्या दिवाळीत हे एक आणखी स्पेशल उटणं (Home made Ubtan for diwali) तयार करून बघा. कडधान्यापासून तयार करण्यात येणाऱ्या या उटण्याची कृती  beautifulyoutips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(How to make utana?)

 

कसं तयार करायचं कडधान्याचं घरगुती उटणं?१. हे उटणं तयार करण्यासाठी आपल्याला हरबरा डाळ, मसूर डाळ, तांदूळ आणि मूग हे सगळं एकेक टीस्पून लागणार आहे. त्याशिवाय २ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून कच्चं दूध आणि चिमूटभर हळद लागेल.

वेटलॉस करायचाय? ब्रेकफास्ट करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा, वजन वाढण्याची चिंता विसरा

२. सगळ्यात आधी हरबरा डाळ, मसूर डाळ, तांदूळ आणि मूग स्वच्छ धुवून घ्या आणि २ ते ३ तासांसाठी कच्च्या दुधामध्ये भिजत घाला.

३. त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्या आणि त्याची पेस्ट गाळणीने गाळून घ्या.

 

४. गाळून झालेल्या या पेस्टमध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला चक्का दही लागणार आहे. ते करण्यासाठी साधं दही एका कापडात २- ३ तास बांधून ठेवा आणि त्याचं सगळं पाणी निथळून टाका. पाणी निथळून गेलेलं घट्ट दही कडधान्याच्या पेस्टमध्ये टाका. 

"एक कप चहा.." अशी ओरडून उद्धटासारखी ऑर्डर द्याल तर.. कॅफे मालकाने पहा काय लावलाय बोर्ड

५. या मिश्रणात चिमूटभर हळद टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि ते काचेच्या डबीत भरून ठेवा. ही डबी फ्रिजमध्ये ठेवल्यास तुम्ही ते उटणं ३ ते ४ दिवस वापरू शकता. 

 

कसं लावायचं उटणं?१. उटण्याचा पातळ थर चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.

२. ब्रायडल ग्लो मिळविण्यासाठी हे उटणं अतिशय फायदेशीर ठरेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीदिवाळी 2022