Lokmat Sakhi >Beauty > फक्त ४ पदार्थ वापरा, ७ दिवसांत कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्या, दिवाळीत दिसाल फ्रेश

फक्त ४ पदार्थ वापरा, ७ दिवसांत कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्या, दिवाळीत दिसाल फ्रेश

Beauty Tips For Dark Circles: डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि डोळ्यांभोवती दिसणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हा उपाय करून बघा. ७ दिवसांत डार्क सर्कल्स कमी होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 01:51 PM2022-10-10T13:51:00+5:302022-10-10T13:52:10+5:30

Beauty Tips For Dark Circles: डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि डोळ्यांभोवती दिसणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हा उपाय करून बघा. ७ दिवसांत डार्क सर्कल्स कमी होतील.

Home made under eye cream for dark circles and fine lines or wrinkles around eyes | फक्त ४ पदार्थ वापरा, ७ दिवसांत कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्या, दिवाळीत दिसाल फ्रेश

फक्त ४ पदार्थ वापरा, ७ दिवसांत कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्या, दिवाळीत दिसाल फ्रेश

Highlightsदररोज सकाळी आणि संध्याकाळी या क्रिमने डोळ्यांभाेवती हलक्या हाताने मसाज करा. आठवडाभरातच डार्क सर्कल्स आणि डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी झाल्याचे जाणवेल. 

दिवाळीपर्यंत फ्रेश लूक मिळावा, चेहरा तजेलदार व्हावा, यासाठी अनेक जणींचे घरगुती उपाय करणं आता सुरु झालंच असणार. कारण तसंही दिवाळी आता अवघी ८- १० दिवसांवर आली आहे. घरगुती उपाय करून किंवा फेशियल, क्लिनअप अशा ब्यूटी ट्रिटमेंट्स घेऊन चेहरा तर स्वच्छ होतो. पण डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचं (Dark Circles) काय करावं, त्यांना कसं लपवावं, हे समजत नाही. म्हणूनच हा एक घरगुती उपाय करून बघा. डार्क सर्कल्स तर कमी होतीलच पण डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्याही (fine lines or wrinkles) कमी होण्यासाठी मदत होईल. हा उपाय इन्स्टाग्रामच्या theglobalistagirl या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हाेममेड क्रिम
हे घरगुती क्रिम तयार करण्यासाठी आपल्याला ४ पदार्थ लागणार आहेत. 
१. १ टेबलस्पून काकडीचा रस

२. १ टेबलस्पून बटाट्याचा रस

३. १ व्हिटॅमिन ई कॅप्सून

४. १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल

 

कसे तयार करायचे क्रिम?
१. हे क्रिम तयार करण्यासाठी एक काचेची बाटली घ्या. ती स्वच्छ पुसून घ्या. त्यात ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्या.

२. वरील सगळे पदार्थ या बाटलीत टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. होममेड अंडर आय क्रिम झाले तयार.

क्रिम कसे लावावे?
- काचेच्या बाटलीत भरून ठेवलेले हे क्रिम तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून पुढील ७ दिवस वापरून शकता. तोपर्यंत ते फ्रेश राहते.
- दररोज सकाळी आणि संध्याकाळी या क्रिमने डोळ्यांभाेवती हलक्या हाताने मसाज करा. 
- आठवडाभरातच डार्क सर्कल्स आणि डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी झाल्याचे जाणवेल. 

 

 

Web Title: Home made under eye cream for dark circles and fine lines or wrinkles around eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.