Hair Dryness Home Remedies : हिवाळ्यातील वातावरणात केस ड्राय आणि निर्जीव होण्याची समस्या जास्तीत जास्त महिलांना फेस करावी लागते. ड्राय केसांमुळे सुंदरता तर कमी होतेच, सोबतच आत्मविश्वासही कमी होतो. केस ड्राय होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. खासकरून हिवाळ्यात थंड हवेमुळेही केस ड्राय होतात. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतली आणि घरगुती उपाय केले तरी केस पुन्हा मुलायम आणि चमकदार करता येतात. जाणून घेऊ त्यासाठी काही उपाय...
ड्राय केस मुलायम कसे कराल?
१) नॅचरल तेलांचा वापर
केसांना पोषण देण्यासाठी नॅचरल तेलांचा वापर करणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं. खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल आणि बदामाचं तेल केसांना भरपूर पोषण देतात. या तेलांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे केसांना मुलायम आणि चमकदार बनवतात. आठवड्यातून किमान २ वेळा हलक्या कोमट तेलाने केसांची मालिश करा. तेल केसांना २ तासांपेक्षा जास्त वेळ लावून ठेवू नका.
२) हेअर मास्क
ड्राय केस मुलायम करण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करू शकता. यासाठी घरीच काही हेअर मास्क तयार करू शकता. एवोकाडो आणि मध, दही आणि अंड्याचा हेअर मास्क केस मुलायम करतात आणि चमकदारही करतात.
३) हेल्दी डाएट
केस मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी त्याना आतून पोषण मिळतं हेही महत्वाचं आहे. जर तुमचे केस ड्राय झाले असतील तर आहारात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि झिंक असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, नट्स आणि सीड्सच्या माध्यमातून हे पोषक तत्व तुम्ही मिळवू शकता. यांच्या मदतीने केसांची वाढही होईल, केस मजबूतही होतील आणि मुलायमही होतील.
४) हीटिंग टूल्स कमी वापरा
केसांना स्टाइल करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर करणं केसांसाठी नुकसानकारक ठरतं. या टूल्समुळे केस आणखी ड्राय होतात. या टूल्सचा वापर कमी करा. या टूल्सचा नियमित वापरामुळे केस ड्राय, निर्जीव होतात.