Join us  

हळद आणि कोरफड परफेक्ट क्रिम; ५ मिनिटात क्रिम तयार, दोनदा लावा, चेहऱ्यावर HD ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 1:51 PM

Home Hacks: हिवाळा सुरु हाेताच त्वचा रूक्ष, कोरडी, निस्तेज होऊ लागते. नेहमीचे क्रिम चेहऱ्याला लावले तरी त्याचा फार उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेसाठी (winter skin care routine) हे खास क्रिम तयार करा....

ठळक मुद्देदिवसातून दोन वेळा हे क्रिम लावल्यास लवकरच खूप चांगला परिणाम दिसून येईल.

त्वचेची सगळ्यात जास्त काळजी हिवाळ्यात (winter care) घ्यावी लागते. कारण बाहेरून खूप जास्त थंडीचा मारा आणि पाणी कमी प्रमाणात प्यायल्यामुळे होणारे डिहायड्रेशन. या दोन्ही गोष्टींमुळे थंडीमध्ये त्वचा लवकरच रूक्ष आणि कोरडी (dry skin in winter) दिसू लागते. बऱ्याचदा आपण नेहमी जे क्रिम चेहऱ्याला लावतो, त्याचाही हिवाळ्यात फार काही उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच हिवाळ्यातही त्वचा टवटवीत आणि चमकदार दिसावी यासाठी चेहऱ्याच्या त्वचेची थोडी जास्त काळजी घ्या आणि हे परफेक्ट क्रिम घरी (home remedy) तयार करा. दिवसातून दोन वेळा हे क्रिम लावल्यास लवकरच खूप चांगला परिणाम दिसून येईल.

 

क्रिम तयार करण्यासाठी लागणारं साहित्यकोरफडीचा गर, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, राईस वॉटर (तांदूळ शिजवण्यासाठी वापरलेलं, उरलेलं पाणी) , ग्लिसरीन, हळद.

कसं तयार करायचं परफेक्ट क्रिम?How to make skin care cream at home- क्रिम तयार करण्यासाठी ३ टीस्पून राईस वॉटर, ३ टी स्पून कोरफडीचा गर, व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल, एक चिमुटभर हळद, १ टीस्पून ग्लिसरीन हे सगळं साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या.- यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि एकजीव करून घ्या.- आपलं परफेक्ट स्किन केअर क्रिम झालं तयार. - हे क्रिम तुम्ही एका हवाबंद काचेच्या डबीत ठेवू शकता.- फ्रिजमध्ये डबी ठेवल्यास हे क्रिम तुम्हाला ७ दिवस वापरता येईल. सकाळ, संध्याकाळ हे क्रिम चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. 

 

 

हे क्रिम लावल्यामुळे त्वचेला होणारा फायदाDIY for winter skin care- हे क्रिम बनविण्यासाठी त्यात प्रामुख्याने आपण राईस वॉटर वापरले आहे. नितळ त्वचेसाठी राईस वॉटर हा एक उत्तम उपाय आहे. कोरिअन ब्यूटीचं सिक्रेट म्हणूनही आता राईस वॉटर खूप जास्त ट्रेण्डमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा राईस वॉटर इतर अनेक गोष्टींसोबत आपण वापरतो, तेव्हा नक्कीच त्याचा अधिक चांगला फायदा दिसून येतो.- हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा नियमित वापर करावा. यामुळे त्वचेवरील डेड स्किनचा थर निघून जातो आणि त्वचा टवटवीत, चमकदार होते. - व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्याचा खूप चांगला परिणाम चेहऱ्यावर  दिसून येतो. - चेहऱ्यावरील वांगाचे डाग, फोडांचे डाग दूर करण्यासाठी, चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नयेत म्हणून कोरफडीचा वापर करणे उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरची सगळी त्वचा नितळ आणि एकसारखी दिसावी यासाठी देखील कोरफड लावली जाते. - चेहरा चमकदार करण्यासाठी आणि पिंपल्स, वांग असा आजार दुर करण्यासाठी हळद उपयुक्त आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी