Join us  

हात गोरे पण कोपरे काळेकुट्ट? कोपरे स्वच्छ करण्याचे ३ सोपे उपाय, दिसतील गोरेपान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 12:53 PM

Home Remedies For Black Elbow Skin Care Tips : पाहूयात हाताचे कोपरे गोरेपान दिसण्यासाठी नेमकं काय करायचं.

आपली त्वचा छान गोरीपान आणि ग्लोईंग असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण काही ना काही कारणाने एकतर त्वचा काळी होते नाहीतर फोड, सुरकुत्या यांमुळे खराब दिसते. त्वचा म्हटलं की आपण विशेष करुन चेहऱ्याची जास्त काळजी घेतो. चेहऱ्याचे सौंदर्य चांगले राखण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंटस घेतो नाहीतर काही ना काही घरगुती उपायही करतो. पण उन्हामुळे किंवा अन्य काही कारणांनी आपले हातही काळवंडतात किंवा खराब होतात. हाताला व्हॅक्सिंग करणे किंवा फारतर मेनिक्यूअर करणे हे उपाय आपण कधीतरी करतो. यामुळे हात गोरे दिसतात. पण हाताचे कोपरे मात्र काळेच राहतात (Home Remedies For Black Elbow Skin Care Tips). 

कोपराच्या भागातील त्वचा घासली गेल्याने किंवा जास्त कोरडी असल्याने ही त्वचा काळी पडते आणि मग काळे झालेले  कोपेरे आपल्याला लपवावे लागतात. यामुळे आपल्याला स्लिव्हजलेस किंवा लहान बाह्यांचे कपडेही घालता येत नाहीत. असे करण्यापेक्षा हे काळे झालेले कोपरे स्वच्छ होण्यासाठी आणि गोरेपान दिसण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. स्वत:कडे थोडे लक्ष दिले आणि स्वत:साठी वेळ काढला तर आपले रुप खुलवू शकतो. पाहूयात हाताचे कोपरे गोरेपान दिसण्यासाठी नेमकं काय करायचं. 

(Image : Google)

१. काळे झालेले कोपरे साफ करण्यासाठी ते घासू नयेत. कारण घासल्याने याठिकाणची त्वचा आणखी खराब होऊ शकते. तसेच आपण टेबलवर किंवा अन्य ठिकाणी कोपरे ठेवून बसतो यामुळेही कोपऱ्यांची त्वचा खराब होते, असे करणे टाळावे.

२. एका बाऊलमध्ये टूथपेस्ट, लिंबातचा रस आणि बेकींग सोडा एकत्र करावे. हे मिश्रण हाताच्या कोपऱ्यांना लावून ठेवावे. १५ ते २० मिनीटांत हे मिश्रण वाळेल. त्यानंतर एखादे मऊ स्क्रबर ओले करुन कोपऱ्यांचा भाग साफ करावा. त्वचेचा काळेपणा घालवण्यासाठी लिंबाचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. 

(Image : Google)

३. कोपरे स्वच्छ करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे बटाट्याचा रस. बटाटा हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा घटक आहे. किसलेल्या बटाट्याचा रस काढून कापसाच्या साह्याने तो कोपऱ्यांवर लावावा. वाळल्यानंतर कोपरे पाण्याने धुवून टाकावेत. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास खराब झालेले कोपरे स्वच्छ होण्यास मदत होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी