केस (Hairs) हे डोक्याच्या ताजप्रमाणे असतात. आपले केस सुंदर, चमकदार, दाट दिसावेत असं प्रत्येकालचा वाटतं. ताण,तणाव, प्रदूषण, अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे केस पांढरे होत जातात. आजकाल केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना उद्भवते. फक्त तरूणांनाच नाही तर लहान मुलांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. (Hair Care Tips) पण तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर चिंता करू नका. काही घरगुती उपाय करून तुम्ही केस पांढरे होण्यापासून रोखू शकतात. (Apply 3 homemade ingredients to your hair to get black hair) केसांना काळे बनवण्यासाठी सोपे घरगुती उपाय पाहूया. (How to Blacken White Hairs) किचनमध्ये असणारे २ ते ३ पदार्थ केसांवर वापरले तरी चांगला फरक दिसून येईल.
१) आवळा आणि मेहेंदीचा हेअर पॅक (Amla & Mehendi Hair Pack)
आवळा आणि मेहेंदीचा हेअर पॅक केसांना प्राकृतिकरित्या काळे बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. १ कप मेहंदी पावडर, २ चमचा आवळा पावडर, १चमचा लिंबाचा रस, १ चमचा दही आणि एका भांड्यात मेहेंदी पावडर आणि आवळा पावडर मिसळा. यात लिंबाचा रस आणि दही घालून व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि २ ते ३ तासांसाठी असंच सोडून द्या. केस ठंड पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या.
लांबचं धूसर दिसतं-चष्मा नको वाटतो? रोज ७ पदार्थ खा, नजर होईल तेज-डोळ्याचे आरोग्य सुधारेल
२) कांद्याचा रस (Onion Juice)
कांद्याचा रस केसांना लावणं केसांना हेल्दी बनवण्यास मदत करते. कांदा वाटून त्याचा रस काढून केसांना लावा. हा रस केसांच्या मुळांना लावून ३० मिनिटांसाठी सोडा त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. कांद्या रसाने केसांचा नॅचरल रंग टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय केस लांबसडकही होतात.
दात वरून पिवळे, आतून किड लागली? ७ दिवस ही पान चावून खा- चांदीसारखे चमकतील दात
३) चहाचे पाणी (Tea Water)
चहाचे पाणी केसांना काळे बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. २ चमचे काळी चहा पावडर आणि १ कप पाणी घ्या पाण्यात चहा पावडर घालून व्यवस्थित उकळून घ्या हे थंड झाल्यानंतर गाळून घ्या. हे पाणी केसांना लावा आणि १ तासासाठी तसंच सोडून द्या. ज्यामुळे केस दाट-पांढरे दिसून येतील. केस नियमित काळे राहण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घ्या, ताण-तणाव फ्री आयुष्य जगा, ताण-तणावमुक्त जीवनशैली केसांच्या आरोग्यासाठी गरजेची आहे.