Join us  

डार्क सर्कल्स, डोळ्यांखालच्या सुरकुत्यांमुळे कमी वयातच वयस्कर दिसता? ४ उपाय- डोळे दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 4:12 PM

Remedies For Dark Circles, Puffy Eye And Undereye Wrinkles: डार्क सर्कल्स, डोळ्यांखालच्या सुरकुत्या किंवा डोळ्यांखालच्या भागावर आलेली सूज म्हणजेच puffy eyes यामुळे आपण आहोत त्यापेक्षा जास्त वयाचे दिसतो...

ठळक मुद्देहे उपाय केल्यामुळे काही दिवसांतच डार्क सर्कल्स, डोळ्यांखालच्या सुरकुत्या आणि puffy eyes या सगळ्याच समस्या कमी होतील.

सध्या त्वचा आणि केस याबाबतच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आहारातून योग्य पोषण न मिळणं आणि दुसरं म्हणजे आपल्या त्वचेला आणि केसांना सतत खूप जास्त प्रदुषण, ऊन, धूळ यांचा सामना करावा लागणं. या दोन्ही गोष्टींमुळे त्वचेचं आणि केसांचं खूप नुकसान होतं. त्यामुळेच तर त्वचेच्या बाबतीत बोलायचं झालं तर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, पिंपल्स, ॲक्ने, डोळ्यांभोवतीचा काळेपणा असा त्रास अनेकींमध्ये दिसून येतो. म्हणूनच आता ३ साधे सोपे घरगुती उपाय पाहा. हे उपाय केल्यामुळे अगदी काही दिवसांतच डार्क सर्कल्स, डोळ्यांखालच्या सुरकुत्या आणि puffy eyes म्हणजेच सुजल्यासारखे वाटणारे डोळे या सगळ्याच समस्या कमी होतील. (home remedies for dark circles, puffy eyes and fine lines under eyes)

 

डार्क सर्कल्स, puffy eyes, डोळ्यांखालच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय

जर तुमच्या डोळ्यांभोवती काळी वर्तूळे असतील, डोळ्यांचा खालचा भाग नेहमीच सुजल्यासारखा वाटत असेल आणि डोळ्यांच्या खाली सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल तर कोणते ३ उपाय लगेचच सुरू करावेत याविषयीचा एक व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

साधी इडली नेहमीच खाता, आता कर्नाटकातली प्रसिद्ध थट्टे इडली खाऊन पाहा, घ्या सोपी रेसिपी....

यामध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास अवघ्या ७ दिवसांतच तुमच्या या तिन्ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या दिसतील. ते उपाय नेमके कोणते ते पाहूया...

 

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बटाट्याचा रस. बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा. हा रस आता डोळ्यांभाेवती हलक्या हाताने चोळून लावा. त्यानंतर १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय १५ दिवसांसाठी दररोज करा. 

स्वयंपाक करताना खूप उकडतं? स्वस्तात मस्त रिचार्जेबल पंखे घ्या, एसीपेक्षाही थंड हवा- बघा ३ पर्याय

२. दररोज रात्री झोपण्यापुर्वी अंडरआय क्रिम लावून किंवा मग ॲलोव्हेरा जेल लावून डोळ्यांभाेवती मसाज करा. यामुळे त्वचेखालच्या भागातला रक्तपुरवठा चांगला होऊन डोळ्यांभोवतीची सूज उतरण्यास मदत होईल.

कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग कसे काढायचे? ४ सोप्या ट्रिक आणि डाग गायब

३. वापरलेल्या ग्रीन टी बॅग ओलसर असताना डोळ्यांवर ठेवा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होतील.

४. एखादा स्टीलचा चमचा अर्ध्या तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर हा थंडगार चमचा डोळ्यांच्या सभोवतालच्या भागात हळूवारपणे फिरवा. डार्कसर्कल्स, डोळ्यांखालची सूज आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी