Join us  

डार्क सर्कल्समुळे चेहरा निस्तेज, डल दिसतो? १ काकडी घ्या- सोपा उपाय, डार्क सर्कल्स गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:26 PM

Home Remedies for Dark Circles Under Eyes : काकडीमध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचं टॅनिंग कमी होतं. त्वचेचा पोत सुधारतो.

जास्त ताण घेणं, उशीरा झोपणं यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं (Dark Circles Solution) यायला सुरूवात होते. एकदा डार्क सर्कल्स यायला लागले की कितीही प्रयत्न केला तरी हे डोळ्यांखालचं टॅनिंग (Tanning) निघत नाही. तासनतास स्क्रिनकडे पाहून काम करणं, कमी वेळ झोपणं आणि मोबाईलचा जास्त वापर यामुळे डार्क सर्कल्स येतात आणि जास्त गडद होत जातात.  डार्क सर्कल्स घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील  ते पाहूया. (Best Home Remedies For Dark Circles)

काकडी बाजारात सहज उपलब्ध होते. काकडी खाल्ल्याने शरीराला आणि त्वचेलाही बरेच फायदे मिळतात. काकडी खाल्ल्यानं शरीर हायड्रेट राहते. त्याचप्रमाणे डोळ्यांनाही फ्रेश फील देण्यासाठी काकडी ठेवली जाते. एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी असते, जे त्वचेला पोषण देते. (Home Remedies for Dark Circles Under Eyes)

एलोवेरा जेलमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला सर्व प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. यातील एंटी ऑक्सिडंट्स तत्व त्वचेला मॉईश्चराईज करतात. याशिवाय काळपटपणा कमी होतो. यातील एंटी ऑक्सिडेंट्स तत्व चेहऱ्यावरील पोर्सचा आकार वाढू देत नाहीत आणि मृतपेशी निघून जाण्यासही मदत होते.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काकडीचा  वापर कसा करायचा?

सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये  ताजे एलोवेरा जेल काढून घ्या. त्यानंतर १ काकडी किसून घ्या. एलोवेरा जेल आणि काकडी व्यवस्थित एकजीव करा. हे दोन्ही पदार्थ मिसळ्यानंतर हे जेल डोळ्यांच्या खाली लावा. हे जेल तुम्ही  हातानं चेहऱ्याला लावू शकता किंवा पातळ ब्रशचा वापर करा.

जवळपास ३० मिनिटांपर्यंत डोळ्यांना लावलेले राहू द्या. त्यानंतर  कापसानं चेहरा स्वच्छ करा.  यानंतर तुम्ही अंडरआय क्रिमचाही वापर करू शकता. या उपायाने डोळ्यांच्या खालची वर्तुळं दूर होण्यास मदत होईल. यामुळे डोळ्यांचा पफीनेस दूर होऊन वॉटर रिटेंशन वाढते. 

डोळ्यांखालच्या बारीक रेषा, सुरकुत्यांमुळे वयस्कर दिसताय? ५ मिनिटं १ व्यायाम करा-दिसाल तरूण

काकडीमध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचं टॅनिंग कमी होतं. त्वचेचा पोत सुधारतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी काकडीचा ज्यूस लिंबाच्या रसात मिसळून चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा. तुम्ही यात एलोवेरा जेल मिसळू शकता. यामुळे सन बर्न कमीसुद्धा कमी होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी