उन्हाळा असो किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत अंडरआर्म्स (Dark Underarms) काळवंडतात. ज्यामुळे अनेक महिला स्लीव्हलेस कपडे परिधान करण्यास टाळतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही महिला महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. काखेतील त्वचा संवेदनशील असल्यामुळे केमिकल प्रोडक्ट्स त्वचेवर थेट परिणाम करतात.
अशा प्रसंगी काखेतील काळपटपणा आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण होते. जर आपल्याला काखेतील काळवंडलेली त्वचा स्वच्छ करायची असेल तर, काही घरगुती उपायांना फॉलो करून पाहा. यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नसून, घरगुती कमी साहित्यात काखेतील काळपटपणा निघून जाईल(Home Remedies for Dark Underarms).
एलोवेरा जेल
चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करतो. यासह काही लोकं केसांसाठी देखील एलोवेरा जेलचा वापर करतात. आपण याचा वापर अंडरआर्म्ससाठीही करू शकतो. हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते, यासह मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. याच्या नियमित वापराने अंडरआर्म्सचे काळे डाग सहज दूर होतील.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? दह्यात एक पदार्थ मिसळून रोज खा,पाहा केसात सुंदर फरक
बटाटा
कच्चा बटाटा हे एक नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. आपण कच्चा बटाटा कापून काखेत फिरवू शकता. यामुळे काखेतील घाण साफ होईल. यासाठी बटाट्याचा रस काढून कापसाच्या गोळ्याच्या मदतीने काखेत लावा. नियमित ही टीप फॉलो केल्याने काही दिवसात फरक दिसेल.
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगरच्या मदतीने आपण अंडरआर्म्सवरील डेड स्किन काढू शकता. हे एक उत्तम डिसइंफेक्टेंट म्हणून काम करते. यासाठी एका वाटीत २ चमचे ऍपल सायडर व्हिनेगर घ्या, त्यात चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. व तयार पेस्ट अंडरआर्मवर लावा. साधारण १५ मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
मेहेंदीत मिसळा स्वयंपाकघरातील २ गोष्टी, अकाली पांढरे झालेले केस, गळण्याची समस्या होईल गायब
लिंबू
लिंबू आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. हे केवळ अंडरआर्म्सची काळवंडलेली त्वचा स्वच्छ करत नसून, डेड स्किन देखील काढून टाकण्यास मदत करते. यासाठी आंघोळीपूर्वी, लिंबाचा रस काखेत लावून चोळा. एक ते दोन मिनिटे लिंबू काखेत चोळल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा.