Join us  

दंड गोरे पण अंडरआर्म्स खूप काळे? १ उपाय, काखेतला काळपटपणा जाईल-घामाची दुर्गंधीही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 8:45 AM

Home Remedies For Dark Underarms : किचनमधील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही त्वचेचा काळपटपणा दूर घालवू शकता.

रंग कितीही गोरा असला तरी  गुडघे, कोपर असे शरीराचे अवयव नेहमीच काळे पडलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे अंडरआर्म्स काळे होण्याची समस्याही उद्भवते.(Home remedies to lighten dark underarms) म्हणूनच लोक स्लिव्हजलेस आऊट फिट घालताना १० वेळा विचार करतात. (How to Get Rid of Dark Armpits) किचनमधील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही त्वचेचा काळपटपणा  घालवू शकता. त्याआधी काखेतील त्वचा काळी का पडते, यावर कोणते घरगुती उपाय फायदेशीर  ठरतात ते समजून घेऊ. (Easy Home Remedies For Dark Underarms)

अंडरआर्म्स काळे का दिसतात

जेव्हा शरीरातील मेलालिन वाढते तेव्हा शरीरातील काही भाग जास्त काळे पडू लागतात.  यात अंडर आर्म्सरचाही समावेश आहे. हेअर रिमुव्हल क्रिमच्या अत्याधिक वापरामुळेही त्वचा काळी पडते. म्हणून अशा वस्तूंचा कमीत कमी वापर करा. हेअर रिमुव्हलसाठी रेजरचा वापर करू नका.

बेसनाच्या साहाय्यानं काळे अंडरआर्म्स कसे स्वच्छ करावेत

बेसनाचा वापर त्वचा उजळवण्यासाठी केला जातो. हेअर रिमुव्हल क्रिम म्हणूनही तुम्ही बेसन वापरू शकता.  हेअर रिमुव्हल क्रिम्सचा जास्त उपयोग केल्यानं अंडरआर्म्स काळे होऊ लागतात. अशा स्थितीत स्लिव्हजलेस आऊटफिट घालण्याची इच्छा नसते. काळे अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता.

हा उपाय करण्यासाठी दोन चमचे बेसनामध्ये थोडं पाणी आणि लिंबाचा रस मिसळा. तिन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र करा. बेसनाची जाडसर पेस्ट बनवा जेणेकरून लावायला सोपं जाईल. अंडरआर्म्सवर ही पेस्ट लावा आणि थोडावेळ चोळा, बेसन सुकू द्या. मग पाण्यानं  स्वच्छ करा.

1) काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी त्वचा एक्सफोलिएट करायला हवी. स्क्रब करण्यासाठी कॉफी किंवा ओट्सचा वापर करू शकता. 

२) अंडरआर्म्सचा दुर्गंध येणं फार सामान्य आहे. तुम्ही डिओ किंवा परफ्यूमचा वापर करू शकता. यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असेल असे पाहा. 

३) जर तुम्ही रेजरनं केस काढत असाल तर अंडरआर्म्सवर जेल बेस्ड पदार्थांचा वापर करा. एलोवेरा जेलसु्दधा तुम्ही वापरू शकता. 

४) रोज अंघोळ करत असताना अंडरआर्म्सही व्यवस्थित स्वच्छ करा. यासाठी साबण न वापरता फोमिंग जेल वापरा.

५) अंडरआर्म्ससचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग करणं उत्तम ठरतं. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स