हिवाळा सुरू झाला, वातावरणात थोडा गारवा जाणवू लागला की त्याचा परिणाम सगळ्यात आधी केसांवर आणि त्वचेवर दिसू लागतो. त्वचेप्रमाणेच केसही अगदी ड्राय, निस्तेज होतात. कधी कधी तर केसांना हात लावला की ते अगदीच खरखरीत झाडूसारखे वाटतात (Home remedies for dry and dull hair). असे केस मग धड मोकळेही सोडता येत नाहीत आणि त्यांची काही हेअरस्टाईलही करता येत नाही. आता ऐन दिवाळीला आपल्या केसांचा असा अवतार होऊ द्यायचा नसेल तर कोरफड वापरून हे काही घरगुती उपाय लगेच करा ( Use of alovera for silky shiny hair). बघा दिवाळीपर्यंत केस कसे एकदम सिल्की आणि चमकदार होऊन जातील (How to get rid of dry hair)...
केस सिल्की- चमकदार होण्यासाठी उपाय
१. कोरफड आणि गुलाब जल
एका वाटीमध्ये २ चमचे कोरफडीचा ताजा गर काढून घ्या. त्यात ४ ते ५ चमचे गुलाब जल टाका. तसेच १ व्हिटॅमिन ई टॅबलेट टाका.
दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही
हे सगळं मिश्रण एकत्र करून केसांच्या मुळाशी तसेच केसाच्या लांबीवर लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केस मऊ होतील तसेच केसांमधून दुर्गंधी येत असेल तर ती देखील कमी होईल.
२. कोरफड आणि दही
हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा ताजा गर किंवा बाजारात मिळणारे कोणतेही ॲलोव्हेरा जेल असं काहीही वापरू शकता. त्यासाठी २ चमचे गर किंवा जेल एका वाटीत घ्या.
पाडवा- भाऊबीजेसाठी सुंदर ड्रेस घ्यायचा? बघा स्वस्तात मस्त आकर्षक भरजरी ड्रेसचे ३ पर्याय
त्यात त्याच्या एवढ्याच प्रमाणात दही टाका. हे मिश्रण केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा. अर्ध्या ते पाऊण तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केसांच्या लांबीनुसार कोरफडीचे आणि दह्याचे प्रमाण वाढवावे किंवा कमी करावे.