त्वचेला जसं वारंवार आपण वेगवेगळे फेसमास्क लावतो आणि त्वचेचं पोषण करतो, तशीच गरज आपल्या केसांनाही असते. तेल, शाम्पू आणि कंडिशनर एवढेच उपचार केसांसाठी नेहमीच पोषक ठरत नाहीत. अनेकदा आपला आहार योग्य नसल्याने केसांच्या वाढीसाठी पोषक असणारे घटक त्यांना मिळत नाहीत आणि मग केसांसंबंधी एकेक समस्या वाढत जाते. म्हणूनच केसांना पौष्टिक असं काहीतरी द्या जेणेकरून त्यांचेही आरोग्य सुधारेल आणि केस गळती कमी होईल..
आपल्याला माहितीच आहे की नारळामध्ये असणारे पौष्टिक घटक केसांसाठी जणू वरदान आहेत. त्यामुळेच नारळाचा केसांसाठी उपयोग करून आपण त्यांना मजबूती देऊ शकतो. नारळाच्या पाण्यामध्ये अनेक खनिजे तर असतातच पण त्यासोबतच व्हिटॅमिन्स, आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटकही मोठ्या प्रमाणात असतात. नारळात असणारे पोटॅशियम केसांच्या मुळांशी ऑक्सिजन प्रवाह वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे केसाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
नारळाच्या पाण्यामध्ये खनिज, व्हिटॅमिन, लोह, पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम यासारख्या पोषण तत्त्वांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपल्या केस आणि शरीरासाठी पोषक आहेत. नारळाचे पाणी केसांच्या मुळांना लावल्याने याचे पूर्ण लाभ केसांना मिळतात. पोटॅशिअममुळे केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढण्यास मदत मिळते. त्यामुळेच नारळपासून घरच्याघरी कोकोनट मिल्क बनवा आणि त्याचा नियमित वापर करा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होईल, जेणेकरून केसांचं गळणंही बऱ्याच प्रमाणात थांबवता येईल.
असं बनवा कोकोनट मिल्क (coconut milk for hairfall)एक नारळ किसून घ्या. किसलेलं नारळ आणि एक कप पाणी मिक्सरमध्ये टाका आणि हे मिश्रण चांगलं वाटून घ्या. आता एका पातळ सुती कपड्यातून हे मिश्रण गाळून घ्या. नारळाचा चोथा कपड्यात राहील आणि दूध वेगळं निघेल. आता पुन्हा एकदा कपड्यातला चोथा मिक्सरमध्ये टाका. त्यात आणखी एक कप पाणी मिसळा आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे मिश्रण पुन्हा गाळून घ्या आणि नारळाचं दूध आणि उरलेला चोथा वेगवेगळा करा.
कसा करायचा कोकोनट मिल्कचा वापरचार टेबलस्पून कोकोनट मिल्क एका बाऊलमध्ये घ्या. त्यामध्ये एक टेबलस्पून मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि ते केसांच्या मुळांशी आणि केसांच्या लांबीवर लावा. यानंतर डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने दोन ते तीन मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर एक टॉवेल गरम पाण्यात बुडवा, पिळून घ्या आणि तो केसांभोवती व्यवस्थित लपेटून घ्या. १० मिनिटांनी टॉवेल काढा. पुन्हा केसांच्या लांबीवर कोकोनट मिल्क लावा. पुन्हा केसांभोवती गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल गुंडाळा आणि केसांना स्टिम द्या. हा प्रक्रिया ३ ते ४ वेळेस केल्यानंतर १ तासाने केस धुवून टाका. केसांचा कोरडेपणा कमी होऊन केस गळती थांबविण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करावा.