Join us  

रुक्ष-कोरडे झालेले केस सिल्की-मुलायम होण्यासाठी करा फक्त ३ गोष्टी; महिन्याभरात दिसेल फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 9:08 AM

Home Remedies for dry hairs to become Silky and Shiny : घरच्या घरी केस मुलायम आणि शायनी होण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...

आपले केस अनेकदा इतके रुक्ष आणि कोरडे होतात की आपल्याला त्याची कोणती हेअरस्टाईल करावी हेच कळत नाही. हे कोरडे झालेले केस अक्षरश: झाडूप्रमाणे दिसायला लागतात आणि आपल्याला या केसांची लाज वाटते. अशा केसांना खालच्या बाजूने फाटे फुटतात आणि त्यांचा रंगही आपोआप भुरा दिसायला लागतो. प्रदूषण, केमिकल्सचा जास्त प्रमाणात वापर, उन्हाचा तडाखा आणि इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर यांचा केसांवर विपरीत परीणाम होतो आणि केसांचा पोत दिवसेंदिवस बिघडत जातो (Home Remedies for dry hairs to become Silky and Shiny).

केस काही केल्या वाढतच नाहीत?; लांबसडक, सिल्की केसांसाठी सोपा घरगुती उपाय-दिसाल सुंदर

एकदा हे केस खराब व्हायला लागले की ते पुन्हा पुर्वीसारखे होण्यासाठी काय करावे हे आपल्याला कळत नाही. मग आपण त्यांच्यावर पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करतो नाहीतर सौंदर्यप्रसाधनांचा वापर करुन ते चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करतो. पण याचा तात्पुरता उपयोग होतो आणि पुन्हा केस पहिल्यासारखेच रुक्ष आणि कोरडे दिसायला लागतात. मग घरच्या घरी केस मुलायम आणि शायनी होण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूया...

(Image : Google)

१. खोबरेल तेल 

केस हेल्दी आणि सिल्की हवे असतील तर त्यासाठी नारळाच्या तेलाचा उपयोग करायला हवा. नारळाच्या तेलाचा वापर करणे तुलनेने सोपे असते आणि त्याचा केसांना अतिशय चांगला फायदा होतो. एका बाऊलमध्ये तेल घेऊन बोटांनी केसांच्या मुळांना त्याने हळूवारपणे मसाज करावा. केस धुण्याच्या आदल्या दिवशी अशाप्रकारे तेल लावल्यास ते केसांत चांगल्या प्रकारे मुरण्यास मदत होते. त्यानंतर केस शाम्पू आणि कंडीशनरचा वापर करुन धुवावेत. यामुळे केस सिल्की आणि शायनी होण्यास मदत होते. 

पावसाळ्यात केस भिजले तर अजिबात करु नका ३ गोष्टी, केस गळणं वाढेल..

२. कोरफडीचा गर

कोरफड ही नैसर्गिक असून केसांच्या आणि त्वचेच्या बहुतांश समस्यांसाठी कोरफड अतिशय उपयुक्त ठरते. केस खूप कोरडे झाले असतील तर कोरफडीचा गर लावल्यास निश्चितच मुलायम होण्यास मदत होते. कोरफडीचा गर घेऊन त्यामध्ये मध घालायचा आणि हे मिश्रण केसांना लावायचे. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास केस मुलायम होण्यास मदत होते. तसेच यामुळे केस वाढण्यासही मदत होते. 

३. अंडे

अंडे आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगले असते त्याचप्रमाणे ते केसांसाठीही चांगले असते. यासाठी अंडे एका बाऊलमध्ये फोडून फेटावे त्यामध्ये एरंडेल तेल घालावे. हे मिश्रण केसांना लावल्यास केसांचा पोत तर सुधारतोच पण केस दाट आणि लांबसडक होण्यासही मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी