Join us  

माधुरी दीक्षितने सांगितलेला ‘हा’ खास उपाय करा- १५ मिनिटांत त्वचा दिसेल फ्रेश-पार्लरची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 3:18 PM

Actress Madhuri Dixit Suggests Her Skin Care Tips: एखाद्या कार्यक्रमासाठी छान तयार व्हायचंय, पण पार्लरला जाण्यासाठी वेळच नसेल तर माधुरी दीक्षित सांगतेय तो सोपा उपाय करून पाहा..(home remedies for dull skin by Madhuri Dixit)

ठळक मुद्देहा उपाय करण्यासाठी तुम्हाला काकडी आणि दूध एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत. 

मोहक हास्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या माधुरी दीक्षितने आज वयाची पन्नाशी ओलांडली आहे. पण असं असलं तरी तिच्या सौंदर्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही. हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ती काय करत असावी, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. आता खुद्द माधुरीनेच चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं असून तिची एक खास ट्रिक तिने शेअर केली आहे (home remedies for dull skin shared by Madhuri Dixit). तुम्हाला जर ऐनवेळी एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल पण त्याआधी पार्लरला जाण्यासाठी वेळच नसेल तर अशावेळी त्वचेला छान चमक आणण्यासाठी काय करावं, यासाठी तिने एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे.(beauty secret of Madhuri Dixit's glowing skin) 

 

सेलिब्रिटी त्यांच्या सौंदर्यासाठी वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरतात हे खरं आहे. पण बऱ्याचदा बरेच सेलिब्रिटी त्यांच्या त्वचेसाठी, केसांसाठी अनेक घरगुती उपाय देखील करतात. तसाच उपाय माधुरीही तिच्या त्वचेसाठी करते.

काही केल्या डोक्यातला कोंडा कमी होत नाही? जावेद हबीब सांगतात १५ दिवसांत कोंडा घालविण्याचा उपाय

तो नेमका कसा करायचा, याविषयीचा तिचा एक व्हिडिओ shamaila3083 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. चेहरा खूप डल दिसत असेल, त्वचा कोरडी झाली असेल किंवा टॅनिंग झालं असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा, असं तिने सुचवलं आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काकडी आणि दूध एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत. 

 

माधुरी दीक्षितच्या स्किन केअर टिप्स

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी काकडी घ्या आणि तिच्या पातळ, गोलाकार चकत्या करा.

आलिया- करिनापेक्षाही जबरदस्त फिट आहेत ६५ वर्षांच्या नितू कपूर! राहाच्या आजीचं फिटनेस सिक्रेट

एका डिशमध्ये थोडं दूध घ्या आणि त्या दुधात काकडीच्या चकत्या भिजवून १५ ते २० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

यानंतर फ्रिजमध्ये ठेवून थंडगार झालेल्या काकडीच्या चकत्या तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरवून ठेवा. १५ मिनिटे तशाच राहू द्या. नंतर त्या काढून घ्या आणि चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीमाधुरी दिक्षित