Join us  

केसांतून नुसता हात फिरवला तरी केस गळून येतात? 'ही' पावडर खाऊन बघा- १५ दिवसांत केस गळणं कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 1:24 PM

Hair Care Tips: केस गळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, म्हणून टेन्शनमध्ये आला असाल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा (How to reduce hair fall?)....

ठळक मुद्देरोज सकाळी रिकाम्या पोटी एक चुटकीभर पावडर गरम पाण्यासोबत घ्या. त्यानंतर १५ मिनिटांसाठी काही खाऊ- पिऊ नका.

केस गळण्याचं प्रमाण हल्ली खूपच वाढत चाललं आहे. यासाठी आपला आहार खूप जास्त कारणीभूत आहे. कारण आपण जे काही खातो, त्यातून आपल्या केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे केसांची वाढ खुंटते, केस गळू लागतात. केसांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण केसांवर वेगवेगळे कास्मेटिक्स लावून पाहातो. यामुळे बऱ्याचदा केसांचं आणखीनच नुकसान होतं. त्यामुळे केसांवर असे सगळे बाह्य प्रयोग टाळा आणि हा एक उपाय करून पाहा (Home remedies for excessive hair loss). यामध्ये आपण केसांसाठी पोषक असणारे पदार्थ वापरून खाण्यासाठी एक पावडर तयार करणार आहोत. ती पावडर कशी तयार करायची (How to reduce hair fall) आणि कधी खायची ते पाहूया...(home made solution for long and strong hair)

 

केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या vaidya_mihir_khatri या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

यासाठी आपल्याला भृंगराज चुर्ण, अक्रोड आणि काळे तीळ असे ३ पदार्थ लागणार आहेत.

वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

यासाठी काळे तीळ आणि अक्रोड यांची पावडर करून घ्या. भृंगराज चुर्ण बाजारात मिळते.

भृंगराज चुर्ण, काळ्या तीळांची पावडर आणि अक्रोड पावडर प्रत्येकी ५०- ५० ग्रॅम घ्या आणि एका एअरटाईट बॉटलमध्ये एकत्र करून ठेवून द्या. 

हिवाळ्यासाठी स्वेटशर्ट घ्यायचे? बघा ३ सुपर स्टायलिश- ट्रेण्डी पर्याय, खिशाला परवडणाऱ्या किमतीत...

रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चुटकीभर पावडर गरम पाण्यासोबत घ्या. त्यानंतर १५ मिनिटांसाठी काही खाऊ- पिऊ नका.

रात्री झाेपण्यापुर्वीही ही पावडर घ्या. १५ दिवसांतच केस गळती कमी झालेली असेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

 

केसांसाठी अक्रोड, काळे तीळ अणि भृंगराज चुर्णचे महत्त्व

तिळामध्ये व्हिटॅमिन ई तसेच केसांसाठी पोषक असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे केसांना पोषण मिळून त्यांची मुळं पक्की होण्यास मदत होते. 

एक्स बॉयफ्रेंड रजत ताराबाबत सुश्मिता सेन सांगतेय- "ब्रेकअप झालं तरी आजही तो माझा सगळ्यात मोठा सपोर्टर, कारण...."

अक्रोडमध्ये कॉपर आणि बायोटिन असते. यामुळे केस गळणं तर कमी होतेच, पण केसांवर छान चमक येते.

काळ्या तिळांमध्ये असलेले omega 3 आणि omega 6 fatty acid केसांचा कोरडेपणा कमी करून केसांना पोषण देते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी