पावसाळ्याच्या दिवसात दमट हवेमुळे केस खूपच जास्त चिकट होतात. केसांचं पूर्ण टेक्स्चरच बदलून जातं. ज्यादिवशी शाम्पू करतो त्या दिवशी आणि फार तर त्याच्या दुसऱ्या दिवशी केस सिल्की दिसतात. पण नंतर मात्र ते चिकट होतात. यालाच आपण फ्रिझी हेअर प्रॉब्लेम असं म्हणतो (Home remedies for freezy hair). तुमच्याही केसांचा असाच प्रॉब्लेम असेल, तर केस सिल्की करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून बघा (What to do for silky hair?). हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त ३ गोष्टी लागणार आहेत.
हा उपाय इंस्टाग्रामच्या kitchenaapketipshumare या पेजवर शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेजण केसांसाठी हा उपाय करू शकतात.
जास्त मेकअप केला तर आई खूप रागावते! पलक तिवारी सांगतेय, आईच्या शिस्तीचा धाक...
हा उपाय केल्यामुळे केस सिल्की तर होतीलच, पण त्यावर छान चमक येईल. शिवाय केसातील कोंडा कमी होऊन त्यांची वाढ होण्यासही मदत होईल. शिवाय हा उपाय करण्यासाठी आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही. त्यामुळे हा एक सुरक्षित उपाय आहे.
केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपायआता घरगुती साधनांचा वापर करून केस सिल्की कसे करायचे ते आपण पाहूया. यासाठी एका वाटीमध्ये अर्धा टेबलस्पून कापुराची पावडर घ्या कापुराच्या बिया घेऊन त्या हाताने चुरगळल्या तरी त्याची पावडर होईल त्यामध्ये २ ते ३ टेबलस्पून बाजारात मिळणारे कोणतेही एलोवेरा जेल टाका.
फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी
नंतर २ ते ३ टेबलस्पून खोबरेल तेल टाका. हे सगळे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. हे मिश्रण एखाद्या पांढऱ्या क्रीम प्रमाणे जेव्हा होईल तेव्हा फेटणे थांबवा. आता हा तयार केलेला घरगुती हेअर मास्क केसांवर लावा. केसांच्या मुळाशी न लावता केसांच्या ग्रोथवर लावावा. साधारण एखादा तास केसांवर राहू द्या आणि नंतर शाम्पू करून टाका. हा उपाय केल्यामुळे केस सिल्की चमकदार होतील.