Lokmat Sakhi >Beauty > कोमट पाण्यात 'हा' पदार्थ घालून प्या, चेहऱ्यावर येईल तेज- कॉस्मेटिक्सची गरजच उरणार नाही 

कोमट पाण्यात 'हा' पदार्थ घालून प्या, चेहऱ्यावर येईल तेज- कॉस्मेटिक्सची गरजच उरणार नाही 

Skin Care Tips For Glowing Skin: चेहऱ्यावर तेज येण्यासाठी आणि त्वचेच्या जवळपास सगळ्याच समस्या कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा..(home remedies for glowing skin) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 09:20 IST2025-02-26T09:18:35+5:302025-02-26T09:20:01+5:30

Skin Care Tips For Glowing Skin: चेहऱ्यावर तेज येण्यासाठी आणि त्वचेच्या जवळपास सगळ्याच समस्या कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा..(home remedies for glowing skin) 

home remedies for glowing skin, how to get radiant glow on skin, how to use ghee for glowing skin | कोमट पाण्यात 'हा' पदार्थ घालून प्या, चेहऱ्यावर येईल तेज- कॉस्मेटिक्सची गरजच उरणार नाही 

कोमट पाण्यात 'हा' पदार्थ घालून प्या, चेहऱ्यावर येईल तेज- कॉस्मेटिक्सची गरजच उरणार नाही 

Highlightsसध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे चेहरा छान तजेलदार होण्यासाठी अनेक नवऱ्यामुलींचे प्रयत्न सुरू असतात. त्यांच्यासाठीही हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे.

काही जणींची त्वचा खूप कोरडी असते, काही जणींच्या चेहऱ्यावर खूप पिगमेंटेशन दिसून येते, काही जणींना पिंपल्स, ॲक्ने असा खूपच त्रास असतो. किंवा काही जणींच्या बाबतीत येणाऱ्या ऋतूसोबत त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. त्वचेच्या अशा बऱ्याचशा तक्रारी कमी करायच्या असतील तर तुमच्या त्वचेला आतूनच पोषण मिळण्याची गरज असते. त्यासाठी आहारतज्ज्ञांनी एक खूपच सोपा आणि छानसा उपाय सुचविला आहे. हा उपाय जर तुम्ही काही दिवस नियमितपणे केला तर तुमचा चेहराही अतिशय तेजस्वी होऊ शकतो, असं त्या म्हणत आहेत (how to get radiant glow on skin?). सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे चेहरा छान तजेलदार होण्यासाठी अनेक नवऱ्यामुलींचे प्रयत्न सुरू असतात. त्यांच्यासाठीही हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे.(home remedies for glowing skin)

 

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी खास उपाय

चेहरा तेजस्वी होण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nutritioncharcha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

महाशिवरात्र स्पेशल: फक्त १० मिनिटांत करा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स, उपवास होईल आणखी चवदार

यामध्ये त्या सांगतात की आपल्या घरात असणारा एक पदार्थ आपला चेहरा खुलविण्यासाठी मदत करतो, पण आपले त्याकडे दुर्लक्ष होत असते. हा पदार्थ म्हणजे साजुक तूप

रोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी करा आणि त्यामध्ये १ चमचा तूप घालून ते पाणी प्या. हा उपाय केल्यामुळे अगदी २ महिन्यांतच तुमच्या त्वचेमध्ये, चेहऱ्यामध्ये खूप छान फरक दिसून येईल. त्यानंतर चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फेशियल, क्लिनअप करण्याची किंवा मग महागडे कॉस्मेटिक्स वापरण्याचीही गरज पडणार नाही.

 

हा उपाय केल्यामुळे शरीराला इतरही अनेक फायदे होतात. तूप आणि गरम पाणी या मिश्रणामुळे पोट साफ होण्यास मदत होते. चयापचय क्रिया आणि पचनक्रिया अधिक चांगली होऊन वजन कमी होण्यास फायदा होतो. 

उपवास करता पण नंतर डोकं जड पडतं, भयंकर ॲसिडीटी होते? ३ टिप्स- त्रास होणार नाही

तुपामध्ये अनेक चांगले फॅट्स असतात जे शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे हा उपाय केल्याने तुमचं सौंदर्य तर खुलेलच पण आरोग्य सुधारण्यासही नक्कीच मदत होईल. 


 

Web Title: home remedies for glowing skin, how to get radiant glow on skin, how to use ghee for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.