Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी शहनाज हुसैन देतात ४ खास टिप्स, त्वचा होईल नितळ

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी शहनाज हुसैन देतात ४ खास टिप्स, त्वचा होईल नितळ

Home Remedies for Glowing Skin : त्वचा ग्लोईँग राहावी यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 11:48 AM2022-06-29T11:48:17+5:302022-06-29T11:52:41+5:30

Home Remedies for Glowing Skin : त्वचा ग्लोईँग राहावी यासाठी आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी

Home Remedies for Glowing Skin : Shahnaz Hussain gives 4 special tips to get natural glow on face, skin will be smooth | चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी शहनाज हुसैन देतात ४ खास टिप्स, त्वचा होईल नितळ

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी शहनाज हुसैन देतात ४ खास टिप्स, त्वचा होईल नितळ

Highlightsफळांमुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाईल आणि चेहऱ्याची त्वचा मऊ होण्यास मदत होईल.घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींतून जपता येते सौंदर्य

उन्हाळा असो वा पावसाळा आपल्या चेहऱ्यावर कायम छान ग्लो हवा असं आपल्याला वाटतं. अगदी कॉलेज किंवा ऑफीसला जायचं असो की एखाद्या समारंभाला जायचं असो. चेहरा मस्त ग्लोइंग असेल तर आपल्याला फारसा मेकअप करावा लागत नाही.  बाहेर फिरल्याने चेहऱ्यावर बसणारे प्रदूषणाचे कण, हार्मोन्समध्ये होणारे बदल, आपला आहार या सगळ्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे कधी पिंपल्स येणे, कधी डाग पडणे तर कधी त्वचा खूप कोरडी होणे आणि सुरकुतणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते (Home Remedies for Glowing Skin). 

(Image : Google)
(Image : Google)

आपले आरोग्य चांगले असणे आणि शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम असणे चांगल्या त्वचेसाठी महत्त्वाचे असते. नियमित व्यायाम केला तर त्वचा नकळत ग्लो करते. तसेच व्यायामामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो. तसेच आहार संतुलित असणे चांगल्या त्वचेसाठी अतिशय आवश्यक असते. आहारात फळं, भाज्या, कच्चे सलाड, कडधान्ये, दही यांचा समावेश आवर्जून असायला हवा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवे. पाहूयात त्वचा ग्लोईँग राहावी यासाठी प्रसिद्ध ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन काही खास टिप्स देतात त्याविषयी...

१. क्लिंजिंग

क्लिंजिंग ही त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी आहे. त्वचेची रंध्रे तेलामुळे झाकली जायला नकोत. तसेच त्वचेचा तेलकटपणा कमी करणे महत्त्वाचे आहे. तुमची त्वचा खूप ऑयली असेल तर त्यासाठी सूट होणारा फेसवॉश किंवा क्लिंजर वापरायला हवा. त्यानंतर चेहरा अॅस्ट्रींजंटनी साफ करायला हवा, त्यामुळे रंध्रे उघडी होण्यास मदत होते. तसेच पार्लरमध्ये केली जाणारी क्लिन अप ट्रिटमेंटही तुम्ही घेऊ शकता. 

२. त्वचा खूप डल दिसत असल्यास

तुमची त्वचा खूप डल दिसत असेल तर अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस एकत्र करुन ते चेहऱ्यावर लावा. २० मिनीटांनी चेहरा धुवा आणि चेहऱ्यावर गार गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवा. 

(Image : Google)
(Image : Google)

३. त्वचा उजळण्यासाठी 

आपल्या चेहऱ्याला सूट होईल असे कोणतेही स्क्रब आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेच्या रंध्रात काही घाण असेल तर ती साफ होईल आणि त्वचा उजळण्यास मदत होईल. यामुळे त्वचेतील ब्लॅकहेडस निघून जाण्यास मदत होईल. पिंपल्स किंवा रॅशेस असलेल्या ठिकाणी स्क्रब लावणे टाळा. घरगुती नैसर्गिक स्क्रब तयार करायचे असेल तर तांदूळ पीठात एक चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा दही घालून हा पॅक चेहऱ्यावर एकसारखा लावा. गोलाकार मसाज करुन पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

४. असा बनवा नैसर्गिक फेस पॅक

गुलाब पाण्यात मुलतानी माती एकत्र करुन ते मिश्रण चेहऱ्याला लावा. हा पॅक तोंड आणि डोळ्याला लागणार नाही याची काळजी घ्या. पॅक चेहऱ्यावर कोरडा झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. पपई, केळं, सफरचंदाचा गर अशा फळांचाही तुम्ही चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी उपयोग करु शकता. या फळांमुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाईल आणि चेहऱ्याची त्वचा मऊ होण्यास मदत होईल. 

Web Title: Home Remedies for Glowing Skin : Shahnaz Hussain gives 4 special tips to get natural glow on face, skin will be smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.