Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे पण ऐन तारुण्यात डाय नको वाटतो? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय, केस होतील काळेभोर

केस पांढरे पण ऐन तारुण्यात डाय नको वाटतो? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय, केस होतील काळेभोर

Home Remedies For Gray Hair (Kes Piklyavr kay uapay karave) : म्हातारपण येण्याआधीच तुमचे केस पांढरे होत असतील तर याचे कारण ताण-तणाव, जेनेटिक्स हॉर्मोनल असंतुलन, असू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:53 AM2023-12-29T10:53:39+5:302023-12-29T11:19:04+5:30

Home Remedies For Gray Hair (Kes Piklyavr kay uapay karave) : म्हातारपण येण्याआधीच तुमचे केस पांढरे होत असतील तर याचे कारण ताण-तणाव, जेनेटिक्स हॉर्मोनल असंतुलन, असू शकते.

Home Remedies For Gray Hair : Beauty Expert Shahnaz Husain Told Natural Home Remedies For Grey Hairs | केस पांढरे पण ऐन तारुण्यात डाय नको वाटतो? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय, केस होतील काळेभोर

केस पांढरे पण ऐन तारुण्यात डाय नको वाटतो? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय, केस होतील काळेभोर

केस पांढरे होणं हे म्हातारपणाचं लक्षण मानलं जातं. अनेकजण पांढरे केस होण्याच्या त्रासाकडे सुरूवातीला फारसं लक्ष देत नाहीत. नंतर केस जास्त पांढरे होऊ लागतात. (Grey Hair Solution) तरूणपणात तुमचेही केस पांढरे होत असतील तर तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. म्हातारपण येण्याआधीच तुमचे केस पांढरे होत असतील तर याचे कारण ताण-तणाव, जेनेटिक्स हॉर्मोनल असंतुलन, असू शकते. (Beauty Expert Shahnaz Husain Told Natural Home Remedies For Grey Hairs)

हेअर डाय आणि कलर केसांवर कोणत्या पद्धतीने कार्य करते? (Grey Hair Solution Without Dying)

केस काळे करण्यासाठी आजकाल बाजारात हेअर हाय आणि हेअर कलर सहज उपलब्ध होतात. केमिकल्सपासून हे डाय तयार  केले जाते म्हणून काही दिवसांनी केसांचा रंग फेड होणं अधिक स्वाभाविक असते. केसांना तात्पुरतं काळे करणारा रंग लावल्यामुळे केस डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते.  यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात. हिना, इंडिगो यांसारख्या हर्बल उत्पादनांचा वापर  केल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते. 

१) आवळ्याचे तेल

मूठभर आवळा उन्हात सुकवून त्याची  जाडसर पावडर बनवून  घ्या. त्यात २ मोठे चमचे शुद्ध नारळाचे तेल मिसळा. एका एअर टाईट काचेच्या बॉटलमध्ये ठेवून १५ दिवसांसाठी उन्हात ठेवा. नंतर तेल व्यवस्थित गाळून मग स्टोअर करा.  आवळा एक  हर्बल सप्लिमेंटाप्रमाणे कार्य करते.  ज्यामुळे पांढरे केस कमी होतात आणि केसांची हरवलेली चमक परत येते.

गुडघे ठणकतात-हाडं खिळखिळी झाली? व्हिटामीन B-12 देणारे ८ व्हेज पदार्थ नियमित खा; फिट राहाल

२) मेथीचे दाणे आणि हिना

कोंड्याची समस्या टाळण्यासाठी मेथीच्या बीयांच्या पावडरमध्ये मेहेंदी पॅक मिसळून लावा. मेहेंदी पावडरमध्ये ४ चमचे लिंबाचा रस आणि  ४ चमचे मेथीची पावडर मिसळून याची जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

प्रोटीन-व्हिटामीन्सचा सुपरडोस आहेत शेवग्याच्या शेंगा; थंडीत रोज खा, वजनही होईल कमी

३) कढीपत्ता आणि नारळाचे तेल

कढीपत्त्यात व्हिटामीन बी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे  मेलानिन केसांमध्ये रिस्टोअर होण्यास मदत होते.  ज्यामुळे केस काळेभोर राहतात. यासाठी कढीपत्ता व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट नारळाच्या तेलात मिसळा. हा हेअर पॅक स्काप आणि केसांची  लांबी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. जवळपास १ तास तसंच ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा हा  प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. 

Web Title: Home Remedies For Gray Hair : Beauty Expert Shahnaz Husain Told Natural Home Remedies For Grey Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.