Lokmat Sakhi >Beauty > केस अचानक फार गळू लागलेत, पांढरेही व्हायला लागलेत? हे १ ऑइल करेल केसांवर जादू

केस अचानक फार गळू लागलेत, पांढरेही व्हायला लागलेत? हे १ ऑइल करेल केसांवर जादू

Home Remedies for Gray Hair : . केसांच्या पोषणाच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर मानले जाते. खाण्यासोबतच केसांवर या फळाच्या तेलाचा वापर केल्यास चांगले बदल दिसून येतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:02 PM2022-07-22T12:02:54+5:302022-07-22T12:04:45+5:30

Home Remedies for Gray Hair : . केसांच्या पोषणाच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर मानले जाते. खाण्यासोबतच केसांवर या फळाच्या तेलाचा वापर केल्यास चांगले बदल दिसून येतील.

Home Remedies for Gray Hair : Black currant seed oil for premature white hair problem solution scalp dandruff | केस अचानक फार गळू लागलेत, पांढरेही व्हायला लागलेत? हे १ ऑइल करेल केसांवर जादू

केस अचानक फार गळू लागलेत, पांढरेही व्हायला लागलेत? हे १ ऑइल करेल केसांवर जादू

केस पांढरे होण्याची समस्या सध्या वृद्धांसह तरूणांमध्येही वाढताना दिसून येत आहे. २० ते २५ वर्षांच्या मुला मुलींमध्ये ही समस्या वाढल्याचं दिसून येत आहे. (Hair Care Tips) केस गळायला लागले किंवा जास्त पांढरे झाले तर आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. कमी वयातच केमिकल डाय वापरणं, महागडे हेअर कलर, ट्रिटमेंट्स घेणं सुरू होतं. यामुळे केस कोरडे होण्याचा धोका वाढतो.  म्हणून या लेखात तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही केसांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता. (Hair fall and white hair problem solution)

 

बरेच लोक असे लोक आहोत ज्यांना ब्लॅक करंट आइस्क्रीम खूप आवडते. काही लोकांनी ब्लॅक करंट केकही खाल्ला असेल. या फळाचा फायदा आपल्या केसांनाही होऊ शकतो. केसांच्या पोषणाच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर मानले जाते. खाण्यासोबतच केसांवर या फळाच्या तेलाचा वापर केल्यास चांगले बदल दिसून येतील. (Black currant seed oil for premature white hair problem solution scalp dandruff)

ब्लॅक करंट बेरीजसारखे दिसतात. विशेषतः युरोप आणि आशियामध्ये त्याची लागवड केली जाते. हे केवळ स्वादिष्ट पदार्थांमध्येच वापरले जात नाही तर औषधी बनवण्यासाठी देखील वापरले जाते. या फळाच्या बियांपासून ब्लॅक कंरट सीड ऑईल तयार केले जाते. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

ब्लॅक करंट सीड ऑईलचे फायदे

१) हेअर गार्ड. कॉमच्या रिपोर्टनुसार ब्लॅक कंरटच्या बियांपासून बनवलेले तेल डोक्याला लावल्यास पांढरे केस पुन्हा काळे होण्यास मदत होते.

२) ज्या लोकांना केस गळतीची समस्या आहे त्यांनी ब्लॅक कंरटच्या बियांचे तेल जरूर वापरावे. यामुळे केस गळणे थांबेल.

३) बदलते हवामान आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे टाळूमध्ये कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे, या तेलात असलेले अँटीऑक्सिडंट्स डोक्यातील कोंडा दूर करतात.

४) केसांमध्ये कोरडेपणा असेल तर त्याचा लूक खूप विचित्र होतो, अशा परिस्थितीत या बियांचे तेल वापरणे आवश्यक आहे.

५) ब्लॅक करंट बियापासून बनवलेल्या तेलाच्या मदतीने डोक्याचे केस जलद वाढतात, कारण केसांच्या वाढीचे गुणधर्म या तेलात आढळतात याशिवाय पांढरे केस कमी होऊन केस काळे होण्यास मदत होते. 

व्हिटामीन सीचा उत्तम स्त्रोत 

व्हिटॅमिन सी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आवश्यक पोषक आहे. व्हिटॅमिन सीच्या सेवनाशी संबंधित विविध आरोग्य फायदे, जसे की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो, व्हिटॅमिन सी देखील एक पोषक तत्व आहे जे केस गळणे आणि केसांच्या वाढीच्या उपचारांमध्ये फायदेशीर आहे.

कमी वयातच केस खूप पांढरे झालेत? 3 सोपे उपाय, म्हातारे होईपर्यंत काळेभोर, दाट केस राहतील

ब्लॅक करंट ऑईलचा वापर कसा करायचा

ब्लॅक करंट ऑईलचा हे हेल्थ फूड स्टोअरमधून विकत घेतलेले असो किंवा घरी बनवलेले असो, केस गळणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. हे फायदेशीर तेल लावण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे टाळूवर थेट लावणं. हे तेल आपल्या तळहातावर घाला घासून घ्या आणि नंतर आपल्या टाळूमध्ये हळूवारपणे मालिश करा. संपूर्ण टाळूवर तेल लावलं जाईल याची खात्री करा. नंतर ते कमीतकमी 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवा.
 

Web Title: Home Remedies for Gray Hair : Black currant seed oil for premature white hair problem solution scalp dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.