Join us  

Home Remedies for Gray Hair : वय कमी पण केस खूपच पांढरे झालेत? ३ उपाय, काळेभोर, दाट केसांचा खास फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 10:21 AM

Home Remedies for Gray Hair : कांद्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या रसाने टाळूवर मसाज करा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरीत्या काळे होतीलच पण केसगळतीसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर केस गळणं, केस पांढरो होणं खूप सामान्य आहे पण जेव्हा  २५ ते ३० वर्ष वयात केस गळतात तेव्हा खूपच चिंताजनक स्थिती असते. अशा स्थितीत कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लगातो आणि लोक म्हतारे दिसू लागतात. (How to get black Hairs naturally)  पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी अनेक हेअर डाय केमिकल बेस्ड क्रिम्सचा वापर केला जातो. पण यातून कायमचा आराम मिळत नाही. (Home Remedies for Gray Hair)

केस पांढरे का होतात? (Causes of white hairs) 

जर आपण जास्त प्रमाणात अन्हेल्दी पदार्थ खाल्ल्यास केसांना योग्य पोषण मिळत नाही आणि वयाच्या 25 ते 30 व्या वर्षी पांढरेपणा येऊ लागतो. आपल्या आहारात तिखट, आंबट आणि खारट पदार्थ कमी करायला हवेत.  आजकाल प्रदूषणाची समस्या खूप वाढली आहे, ज्याचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. म्हणूनच प्रदूषित हवा, धूळ आणि धूर यांपासून केसांचे संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त टेन्शन घेणे, रात्री उशिरा झोपणे आणि ७ ते ८ तासांची झोप न लागणे. मन शांत आणि स्थिर ठेवलं तर अशा समस्या उद्भवणार नाहीत.

पांढरे केस काळे करण्याचे नैसर्गिक उपाय

दही

नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी दही वापरता येते. यासाठी टोमॅटो बारीक करून दह्यात मिसळा. नंतर त्यात थोडे निलगिरीचे तेल मिसळा. आता या मिश्रणाने दर ३ दिवसांनी डोक्याला मसाज करा, काही आठवड्यांत तुमचे केस काळे होतील.

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या रसाने टाळूवर मसाज करा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरीत्या काळे होतीलच पण केसगळतीसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.

कढीपत्ता

जर तुमचे केस लहान वयातच काळे होऊ लागले असतील तर कढीपत्ता तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यात बायोएक्टिव्ह गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. ही पाने बारीक करून केसांच्या तेलात मिसळा. यापासून तयार होणारी पेस्ट आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी लावावी.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स