Lokmat Sakhi >Beauty > पांढरे केस काळे करायचे तर वापरा 'ही' नाजूक फुलं, ना साइड इफेक्ट ना महाग डायची कटकट

पांढरे केस काळे करायचे तर वापरा 'ही' नाजूक फुलं, ना साइड इफेक्ट ना महाग डायची कटकट

Natural Remedies To Turn Gray Hair Black: केस पांढरे झाले असतील तर फुलांचा वापर करून हा एक घरगुती उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2024 12:51 PM2024-05-03T12:51:25+5:302024-05-03T18:13:38+5:30

Natural Remedies To Turn Gray Hair Black: केस पांढरे झाले असतील तर फुलांचा वापर करून हा एक घरगुती उपाय करून पाहा...

home remedies for gray hair, use of sadafuli flower for white hair, natural remedies to turn gray hair black | पांढरे केस काळे करायचे तर वापरा 'ही' नाजूक फुलं, ना साइड इफेक्ट ना महाग डायची कटकट

पांढरे केस काळे करायचे तर वापरा 'ही' नाजूक फुलं, ना साइड इफेक्ट ना महाग डायची कटकट

Highlights हा उपाय केल्याने पांढरे केस काळे होतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

कमी वयात केस पांढरे होणं ही समस्या हल्ली खूपच वाढली आहे. कमी वयात केस पांढरे झाल्यामुळे ते लपवायचे कसे, हा मोठाच प्रश्न पडतो. काही जण त्यासाठी मेहेंदीचा वापर करतात. पण मेहेंदी लावणं हे तसं बरंच किचकट आणि वेळखाऊ काम. त्यामुळे अनेकांना ते नको वाटतं. त्यानंतर हेअर कलर किंवा डाय करण्याचा पर्याय अनेक जण टाळतात. कारण केसांवर कोणतेही केमिकलयुक्त पदार्थ लावायला नको वाटते (home remedies for gray hair). म्हणूनच आता हे दोन्ही पर्याय नको असतील तर पांढरे केस रंगविण्यासाठी सदाफुलीच्या नाजूक फुलांचा वापर करून पाहा.. (use of sadafuli flower for white hair)

 

पांढरे केस काळे करण्यासाठी सदाफुलीचा वापर

पांढरे केस काळे करायचे असतील तर त्यासाठी सदाफुलीच्या फुलांचा वापर कसा करायचा, याविषयीची माहिती masalakitchenbypoonam या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

प्रत्येक गृहिणीला माहिती असाव्याच अशा ७ सुपरस्मार्ट किचन टिप्स- काम होईल एकदम सोपं- झटपट

हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा चहा पावडर आणि ५ ते ६ चमचे पाणी टाका आणि हे मिश्रण उकळायला ठेवा. जेव्हा हे मिश्रण उकळून थंड होईल तेव्हा त्यामध्ये १० ते १५ सदाफुलीची फुलं आणि तेवढीच पानं टाका. 

यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि गाळून घ्या.

 

आता गाळून घेतलेलं मिश्रण एका लोखंडी कढईमध्ये टाका. त्यात १ चमचा कॉफी पावडर टाका आणि ते गरम करायला ठेवा.

घामोळे आल्यामुळे खूपच त्रास होतो? यापैकी कोणताही उपाय करा, आग कमी होईल- थंड वाटेल

हळूहळू ते मिश्रण घट्ट होत जाईल आणि त्याला काळपट रंग येईल. असं झालं की गॅस बंद करा. यानंतर हे मिश्रण थंड झालं की ब्रशच्या मदतीने पांढऱ्या केसांवर लावा. १ ते दिड तासाने केस धुवून टाका. हा उपाय केल्याने पांढरे केस काळे होतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: home remedies for gray hair, use of sadafuli flower for white hair, natural remedies to turn gray hair black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.