आजकाल केसांना काळे करण्यासाठी पार्लरला जाऊन लोक हजारो रुपये खर्च करतात पण तरीही हवातसा फरक दिसत नाही. हेअर कलरिंगचा ट्रेंड बाजारात खूप आहे. (How to get black hairs naturally) पण त्यात भरपूर केमिकल्स असतात. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरची मदत घेऊ शकता. हे उपाय केल्यास तुम्हाला डाय करण्याची गरज लागणार नाही. (Hair Care Tips)
१) मेहेंदी वापरा
केस काळे करण्यासाठी पूर्वापार मेहेंदीचा वापर केला जात आहे. केस काळे करण्यासाठी कोणत्याही मोठ्या भांड्यात ५-६ चमचे मेहेंदी घाला. त्यात १ चमचा शिककाई पावडर आणि पाणी घाला.त्याची जाडसर पेस्ट बनवा. मेहेंदी रात्रभर सेट करण्यासाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मेंदीमध्ये १ अंडं आणि १ चमचा दही घाला. नैसर्गिक केसांचा रंग बनला आहे.
२) कॉफी
सर्वप्रथम कॉफी बीन्स ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. आता एक स्ट्रॉग कॉफी बनवा. आता कॉफी 2:1 च्या प्रमाणात कंडिशनरमध्ये मिसळा. हा तुमचा नैसर्गिक केसांचा रंग आहे. कॉफीपासून बनवलेला हा रंग तुमच्या केसांना नीट लावा. डाई केसांमध्ये सुमारे 1 तास ठेवा, नंतर आपले केस धुवा. कॉफीची ही पेस्ट लावल्याने केसांचा रंग काळा होईल.
३) बीट
बीटाच्या सेवनानं शरीराला फायदे होतात तसचे केसांनाही होतात. बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते. गुलाबी गाल आणि ओठांसाठी बीटरूटचा वापर केला जातो. तुम्ही केसांमध्ये बीटरूट देखील वापरू शकता. जर तुम्हाला केसांचा खोल लाल रंग हवा असेल तर बीटरूट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. सर्व प्रथम 4-5 बीटरूटचा रस काढा. आता त्यात ३-४ चमचे खोबरेल तेल घाला. केसांना रंग देण्यासाठी जाड ब्रश घ्या. आता ब्रशला केसांच्या रंगात भिजवा नंतर केसांना लावा. ब्रशच्या मदतीने केसांना रंग सहज लागू शकतो.