Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झाले? केमिकल्सयुक्त डाय विसरा, हा घरगुती डाय लावा; काळेभोर होतील केस

केस पांढरे झाले? केमिकल्सयुक्त डाय विसरा, हा घरगुती डाय लावा; काळेभोर होतील केस

Home Remedies For Grey Hairs : कमी वयात केस पांढरे झाल्यास तुम्ही केमिकल्सयुक्त हेअर डायचा २ वेळा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:09 AM2024-04-17T09:09:00+5:302024-04-18T22:47:10+5:30

Home Remedies For Grey Hairs : कमी वयात केस पांढरे झाल्यास तुम्ही केमिकल्सयुक्त हेअर डायचा २ वेळा वापर करू शकता.

Home Remedies For Grey Hairs : How To Get Black Hairs Naturally | केस पांढरे झाले? केमिकल्सयुक्त डाय विसरा, हा घरगुती डाय लावा; काळेभोर होतील केस

केस पांढरे झाले? केमिकल्सयुक्त डाय विसरा, हा घरगुती डाय लावा; काळेभोर होतील केस

केसांना काळे बनवण्यासाठी  मेलानिन  नावाचे पिग्नेंट फायदेशीर ठरते. जेव्हा मेलानिनचे प्रोडक्शन कमी होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. (Home Remedies For Grey Hairs) ऊन्हामुळे केसांचा पोत बिघडतो आणि केस गळू लागतात. केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्स लावल्यामुळे आणि ताण-तणाव केल्यामुळे केस पांढरे व्हायला सुरूवात होते. (Hair Care Tips)

पांढरे केस वाढत्या वयाची निशाणी आहे. (Grey Hair Solution) कमी वयात केस पांढरे झाल्यास तुम्ही केमिकल्सयुक्त हेअर डायचा २ वेळा वापर करू शकता. १५ दिवसात तुम्ही केस काळे बनवू शकता.बाजारातील केमिकल्सयुक्त हेअर डायचा वापर करण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी  नॅचरल हेअर डाय बनवू शकता. (How To Get Black Hairs)

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही हेअर डाय बनवू शकता. हा हेअर डाय बनवण्यासाठी एक कप मेहेंदीची पावडर घ्या त्यात ३ चमचे आवळा पावडर आणि १ चमचा कॉफी पावडर घ्या. सगळ्यात आधी जवळपास ३ वस्तू  एकत्र मिसळा, त्यात पाणी घालून पेस्ट  तयार करा. (How To Get Black Hairs Naturally) 

लादी पुसताना पाण्यात 'हा' पदार्थ घाला; घरात एकही डास-किटक येणार नाही; चमकदार दिसेल घर 

ही पेस्ट तयार करण्यासाठी  केसांच्या मुळांपर्यंत लावा. जवळपास एक ते दीड तास मेहंदी डाय केसांना लावू शकता नंतर केस व्यवस्थित धुवून घ्या. हा हेअर डाय बनवणयासाठी मेहेंदीसोबत दुप्पट  इंडीगो पावडर मिसळा. ज्यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग येईल. आठवड्याभरात केसांना काळा रंग येईल.

पांढऱ्या केसांना काळे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.कॉफीने केस धुतल्यास किंवा कॉफी तयार करून केसांना एक ते दीड तास ठेवल्यानंतर केस धुतल्यास केसांचा रंग काळा होऊ लागतो. कॉफी आठवड्यातून दोनदा वापरली जाऊ शकते. खोबरेल तेल, लिंबू आणि कढीपत्ता यांचे मिश्रण नियमितपणे केसांना लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतात.

हाताने न घासता टॉयेलट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक; पटापट नव्यासारखं क्लिन होईल टॉयलेट

यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात कढीपत्ता टाका आणि तेल शिजवा. आता त्यात लिंबाचा रस पिळून केसांना चांगली मसाज करा. या तेलाने केसांना मुळापासून शेवटपर्यंत पोषण मिळते, केस काळे होऊ लागतात आणि केसांची वाढही चांगली होते. लक्षात ठेवा की जास्त गरम तेलाने केसांना मसाज करू नका, फक्त कोमट तेल वापरा.

आवळ्याचा रस केसांना नैसर्गिकरित्या काळे करतो. रोज डाय लावण्याचा त्रास टाळण्यासाठी आवळ्याचा रस केसांना लावता येतो. आवळ्याचा रस काही तेलात मिसळूनही केसांना लावता येतो. व्हिटॅमिन सी चे गुणधर्म केसांसाठी चांगले आहेत आणि केसांना पूर्ण पोषण देतात.

Web Title: Home Remedies For Grey Hairs : How To Get Black Hairs Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.