केसांच्या संबंधित समस्यांचा सामना अनेकांना करावा लागतो. आजकाल केस पातळ होणं, वेळेआधीच पांढरे होणं अशा समस्या अनेकांना उद्भवत आहेत. ( Natural Home Remedies for Hair Growth in 10 rupees) आपले केस लांब, दाट दिसावं असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्येकाची शारीरिक क्षमता आणि खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असल्यामुळे सर्वांचेच केस व्यवस्थित वाढतात असं नाही. काही आयुर्वेदीक उपायांचा वापर करून तुम्ही भराभर केस वाढवू शकता. (Home Remedies For Hair Fall)
कढीपत्ता
प्रॅक्टो.कॉमच्या रिपोर्टनुसार १० रूपयांचा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरेल. यात आयर्न, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. कढीपत्ता नारळाच्या तेलात मिसळून लावा. एका वाटीत नारळाचे तेल उच्च आचेवर ठेवा. त्यात मूठभर कढीपत्ते घालून शिजवून घ्या. कढीपत्ते शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल एका बॉटलमध्ये भरून ठेवा. कढीपत्त्याच्या तेलाचा वापर करून तुम्ही रात्री हेडमसाज करू शकता. या तेलाच्या वापराने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल आणि केस दाटही होतील.
केस पातळ दिसतात-अजिबात वाढत नाही? नारळाचे दूध 'या' पद्धतीने लावा, दाट होतील केस
आवळा
आवळ्यात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंटस, फॅटी एसिड्स मोठ्या प्रमाणात असातात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी ते फायदेशीर ठरतात. हेअर फॉलिक्ससाठीही आवळा गुणकारी ठरतो. आवळ्याचा रस केसांना लावल्याने केसांची भराभर वाढ होते. तुम्ही आवळ्याच्या पावडरचा हेअर मास्कसुद्धा लावू शकता.
कडुलिंबाचे पान
कडुलिंबाची पानं तुम्हाला ५ ते १० रूपयांत कुठेही मिळतील. यात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे फ्री रेडिकल्स दूर राहतात. कडुलिंबाची पानं केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. पातळ केसांना वाढवण्यासाठा तुम्ही हेअर मास्क किंवा कडुलिंबाचे तेल डोक्याला लावू शकता. कडुलिंबाची पानं नारळाच्या तेलात मिसळून लावल्यास केस मोठे होतील.
सतत गळून केस शेपटीसारखे पातळ झाले? राईच्या तेलात हा पदार्थ घालून लावा; घनदाट होतील केस
तांदूळाचे पाणी
तांदूळात अनेक पोषक तत्व असतात. तांदूळाचे पाणी केसांसाठी कंडीशनर प्रमाणे काम करते. या पाण्याने केस धुतल्यास केस सॉफ्ट होतात आणि केसांना मॉईश्चर मिळते. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. केस धुतल्यानंतर तांदूळाचे पाणी केसांना लावून १५ ते २० मिनिटांसाठी तसंच ठेवा नंतर साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांवर चांगली शाईन येईल.