केस गळणं थांबवण्यासाठी आणि केसांची चांगली वाढ होण्यासाठी हेअर ऑयलिंग हा उत्तम पर्याय आहे. प्रदूषण, ताण-तणाव चुकीची लाईफस्टाईल आणि आहारातील काही चुका केस गळण्याचं कारण ठरतात. केसाचं गळणं थांबवण्याासठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू तेलं उपलब्ध आहेत. (Home remedies for hair growth faster)
केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्समुळे केसाचं नुकसान होऊ शकतं. आठवड्यातून कमीत कमी दोनवेळा केसांना तेल लावायलाच हवं. नियमित केसांना तेल लावल्यानं केस मुळापासून मजबूत होतात. यामुळे केसांना पोषण मिळते. केस गळणं थांबवण्यासाठी होममेड हेअर ऑईल फायदेशीर ठरते.
काळ्या बीया हेल्दी स्काल्प आणि केसांच्या वाढीला चालना देतात. यात एंटी इंल्मेटरी गुणधर्म असतात जे केसांना चांगले ठेवण्यास मदत करतात. काळ्या बियांच्या तेलानं केस पांढरे होणं रोखता येतं. केस गळणं नियंत्रणात राहतं आणि केसांची चांगली वाढ होते.
सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दोन मूठ भरून काळं जीर आणि पाच कप पाणी घाला. १० मिनिटं उकळ्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. हे लिक्विड गाळल्यानंतर एक चमचा एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल घाला आणि एका डब्यात साठवून ठेवा.
कढीपत्ता तुमच्या केसांसाठी एक उत्तम पदार्थ आहे. प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात कढीपत्ता अगदी सहज उपलब्ध असतो. कढीपत्ता पोषक तत्व, एंटीऑक्सिडंट्स आणि अमिनो असिड्सनं परीपूर्ण असतो. ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस गळणं थांबते.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती? भराभर केस वाढण्यासाठी जावेद हबीबचा सल्ला; रोज ‘हे’ तेल वापरा
कढीपत्त्यातील बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन केसांच्या वाढीस चालना देतात. कढीपत्ता दोन दिवसांपेक्षा जास्त उन्हात सुकविण्यासाठी ठेवा नंतर खोबरेल तेलात उकळवा. थंड होऊ द्या.फिल्टर केल्यानंतर, या तेलाने केस आणि टाळूची मालिश करा.
चेहरा, मानेवर खूप टॅनिंग झालंय? चमचाभर कॉफीनं १ उपाय करा; उजळदार दिसेल त्वचा
केसांच्या वाढीसाठी आणि केस मजबूत करण्यासाठी कडुलिंब आणि बदाम एखाद्या जादुई गोष्टीपेक्षा कमी नाहीत. यात अँटी-फंगल, अँटी-इंफ्लॅमेटरी आणि अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी ऍसिडस् आहेत. या औषधी फायद्यांमुळे तुमचे केस कोंडामुक्त, मजबूत आणि निरोगी होऊ शकतात. कडुलिंबाची पाने १-२ दिवस वाळवा. बदामाचे तेल कोरड्या कडुलिंबाच्या पानांसह उकळवा. पानांना तेल शोषण्यासाठी आठवडाभर वेळ द्या. तेल गाळून घ्या आणि ते तुमच्या वापरासाठी तयार आहे.
कलौंजी बीया आणि ऑलिव्ह ऑईल
या बियांमध्ये आवश्यक फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, जस्त, लोह, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे अ, ब आणि क असतात. हे सर्व तुम्हाला मजबूत, निरोगी केस देण्यासाठी एकत्र काम करतात. यामुळे केसांचे कंडिशनिंगही होते.