Lokmat Sakhi >Beauty > केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

Hair Care Tips: केसांची वाढ होतच नाही, ही अनेक जणींची तक्रार असते. ही तक्रार दूर करणारा हा एक घरगुती हेअरमास्क (hair mask for hair growth) एकदा वापरून बघाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 03:43 PM2022-12-06T15:43:00+5:302022-12-06T15:43:41+5:30

Hair Care Tips: केसांची वाढ होतच नाही, ही अनेक जणींची तक्रार असते. ही तक्रार दूर करणारा हा एक घरगुती हेअरमास्क (hair mask for hair growth) एकदा वापरून बघाच.

Home remedies for hair growth, Hair mask for long and strong hair, Solution for stimulating hair growth | केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

Highlightsकेसांची वाढ खुंटलेली असणे किंवा केस खूपच हळूहळू वाढणे असा त्रास अनेक जणांना जाणवतो. म्हणूनच त्यासाठीच बघा हा एक खास उपाय. 

केसांची वाढच खुंटली आहे, किती दिवसांपासून केस जसेच्या तसेच आहेत, केस मुळीच वाढत नाहीत (hair mask for hair growth).. ही तक्रार अनेक जणींची असते. केसांना योग्य ते पोषण मिळालं नाही, तर असा त्रास जाणवू लागतो. बऱ्याचदा आपल्या आहारातून केसांना पुरेशी पोषणमुल्ये मिळत नाहीत आणि शिवाय आपल्याकडून केसांची योग्य प्रकारे काळजीही घेतली जात नाही. या दोन्ही गोष्टींमुळे केसांचे नुकसान होते आणि मग केसांच्या तक्रारी सुरू होतात. केसांची वाढ खुंटलेली असणे किंवा केस खूपच हळूहळू वाढणे (Home remedies for hair growth) असा त्रास अनेक जणांना जाणवतो. म्हणूनच त्यासाठीच बघा हा एक खास उपाय. 

 

इन्स्टाग्रामच्या sonals_skincare या पेजवर हा उपाय सुचविण्यात आला आहे. यामध्ये स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरून केसांसाठी हेअरमास्क कसा तयार करायचा, याविषयी माहिती देण्यात आली आहे.

अमृता खानविलकरने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, बघा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ

हा हेअरमास्क काही महिने आठवड्यातून २ वेळा नियमितपणे वापरल्यास केसांची चांगली वाढ होईल, असं सांगण्यात आलं आहे. हेअरमास्क तयार करणे आणि वापरणे सोपे आहे. फक्त उत्तम परिणाम दिसून येण्यासाठी त्याचा नियमितपणे वापर होणे गरजेचे आहे. 

 

केसांच्या वाढीसाठी हेअरमास्क
साहित्य

२ टेबलस्पून तांदूळ
दिड टेबलस्पून मेथीचे दाणे
८ ते ९ लवंगा
कसा करायचा हेअरमास्क?
१. सगळ्यात आधी एका काचेच्या बरणीमध्ये तांदूळ, मेथीचे दाणे आणि लवंगा टाका.

ताकातली मिरची खाल्लीच नाही? करुन पाहा तिखट-आंबट ताकातली मिरची, पारंपरिक चमचमीत रेसिपी

२. साधारण हे सगळे पदार्थ व्यवस्थित भिजतील एवढं पाणी घाला.

३. आता बरणीचं झाकण लावून टाका आणि ती रात्रभर तशीच राहू द्या.

४. दुसऱ्यादिवशी भिजवलेले हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करा.

५. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला आणि केसांवर लावा.

६. साधारण एक ते दिड तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

 

 

Web Title: Home remedies for hair growth, Hair mask for long and strong hair, Solution for stimulating hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.