Join us  

केस वाढतच नाहीत? फक्त ३ गोष्टी वापरून तयार करा हेअरमास्क, केस वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2022 3:43 PM

Hair Care Tips: केसांची वाढ होतच नाही, ही अनेक जणींची तक्रार असते. ही तक्रार दूर करणारा हा एक घरगुती हेअरमास्क (hair mask for hair growth) एकदा वापरून बघाच.

ठळक मुद्देकेसांची वाढ खुंटलेली असणे किंवा केस खूपच हळूहळू वाढणे असा त्रास अनेक जणांना जाणवतो. म्हणूनच त्यासाठीच बघा हा एक खास उपाय. 

केसांची वाढच खुंटली आहे, किती दिवसांपासून केस जसेच्या तसेच आहेत, केस मुळीच वाढत नाहीत (hair mask for hair growth).. ही तक्रार अनेक जणींची असते. केसांना योग्य ते पोषण मिळालं नाही, तर असा त्रास जाणवू लागतो. बऱ्याचदा आपल्या आहारातून केसांना पुरेशी पोषणमुल्ये मिळत नाहीत आणि शिवाय आपल्याकडून केसांची योग्य प्रकारे काळजीही घेतली जात नाही. या दोन्ही गोष्टींमुळे केसांचे नुकसान होते आणि मग केसांच्या तक्रारी सुरू होतात. केसांची वाढ खुंटलेली असणे किंवा केस खूपच हळूहळू वाढणे (Home remedies for hair growth) असा त्रास अनेक जणांना जाणवतो. म्हणूनच त्यासाठीच बघा हा एक खास उपाय. 

 

इन्स्टाग्रामच्या sonals_skincare या पेजवर हा उपाय सुचविण्यात आला आहे. यामध्ये स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरून केसांसाठी हेअरमास्क कसा तयार करायचा, याविषयी माहिती देण्यात आली आहे.

अमृता खानविलकरने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, बघा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ

हा हेअरमास्क काही महिने आठवड्यातून २ वेळा नियमितपणे वापरल्यास केसांची चांगली वाढ होईल, असं सांगण्यात आलं आहे. हेअरमास्क तयार करणे आणि वापरणे सोपे आहे. फक्त उत्तम परिणाम दिसून येण्यासाठी त्याचा नियमितपणे वापर होणे गरजेचे आहे. 

 

केसांच्या वाढीसाठी हेअरमास्कसाहित्य२ टेबलस्पून तांदूळदिड टेबलस्पून मेथीचे दाणे८ ते ९ लवंगाकसा करायचा हेअरमास्क?१. सगळ्यात आधी एका काचेच्या बरणीमध्ये तांदूळ, मेथीचे दाणे आणि लवंगा टाका.

ताकातली मिरची खाल्लीच नाही? करुन पाहा तिखट-आंबट ताकातली मिरची, पारंपरिक चमचमीत रेसिपी

२. साधारण हे सगळे पदार्थ व्यवस्थित भिजतील एवढं पाणी घाला.

३. आता बरणीचं झाकण लावून टाका आणि ती रात्रभर तशीच राहू द्या.

४. दुसऱ्यादिवशी भिजवलेले हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करा.

५. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला आणि केसांवर लावा.

६. साधारण एक ते दिड तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी