Lokmat Sakhi >Beauty > केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा

How to Control Hair Fall: कांद्याच्या रसामध्ये हे २ सिक्रेट पदार्थ टाका आणि मग बघा कमाल.. केस वाढतील झरझर आणि शिवाय होतील सिल्की- शायनी.(onion juice for hair growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 12:48 PM2022-10-13T12:48:16+5:302022-10-13T12:48:53+5:30

How to Control Hair Fall: कांद्याच्या रसामध्ये हे २ सिक्रेट पदार्थ टाका आणि मग बघा कमाल.. केस वाढतील झरझर आणि शिवाय होतील सिल्की- शायनी.(onion juice for hair growth)

Home Remedies For Long And Strong Hair: Add these two ingredients in onion juice and see the magic on your hair | केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा

Highlightsकांद्याच्या रसामध्ये २ पदार्थ आणखी टाकले, तर मग केसांची वाढ तर चांगली होतेच, पण केसांवर नैसर्गिक चमक येण्यासही मदत होते.

केस खूप गळत (hair fall) आहेत किंवा केस वाढतच नाहीत (hair growth).. किती दिवसांचे केस एवढे ते एवढेच दिसत आहेत.. केसांना फाटे फुटले (split hair) आहेत, अशी अनेकींची समस्या असते. या सगळ्यांवर एक सोपा उपाय म्हणजे कांद्याचा रस. कांद्याच्या रसामध्ये (onion juice) असणारे घटक डोक्याच्या त्वचेसाठी पोषक ठरतात आणि त्यामुळे मग केसांची वाढ चांगली होती. हा उपाय कसा करायचा, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण त्यासोबत जर कांद्याच्या रसामध्ये २ पदार्थ आणखी टाकले, तर मग केसांची वाढ तर चांगली होतेच, पण केसांवर नैसर्गिक चमक येण्यासही मदत होते. हा उपाय इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

कसा करायचा उपाय?
१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा, १ टीस्पून लवंग, २ टीस्पून मेथ्या आणि १ व्हिटॅमिन ई कॅप्सून लागणार आहे.

दिवाळीच्या खर्चाचं टेन्शन आलं? बजेट कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ४ गोष्टी कटाक्षाने पाळा..

२. सगळ्यात आधी तर कांद्याची टरफलं काढून टाका आणि कांदा किसून किंवा मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस करून घ्या. 

३. कांद्याचा रस एका वाटीत काढा. त्यामध्ये मेथ्या आणि लवंगा रात्रभर भिजत ठेवा.

४. सकाळी हा रस गाळून घ्या आणि मग तो बोटांच्या टोकांनी हळूवारपणे केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा.

५. साधारण ३ ते ४ तासांनी केस धुवून टाका. 

६. ३ ते ४ महिने आठवड्यातून २ वेळा हा उपाय नियमितपणे केल्यास केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल.

 

हा उपाय केल्याने केसांना होणारे फायदे
१. हा केल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण खूप कमी होते.

२. केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते.

काजोलची ३४ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, गोटा पट्टी बॉर्डरमुळे दिसतेय खुलून; साडीची खासियत अशी की..

३. केसांवर नैसर्गिक चमक येते.

४. केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण कमी होतं. 

 

 

Web Title: Home Remedies For Long And Strong Hair: Add these two ingredients in onion juice and see the magic on your hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.