Lokmat Sakhi >Beauty > केस वाढतच नाहीत? 'हे' जादुई तेल लावा, एवढे लांबसडक होतील की सांभाळणंही कठीण होईल...

केस वाढतच नाहीत? 'हे' जादुई तेल लावा, एवढे लांबसडक होतील की सांभाळणंही कठीण होईल...

Homemade Hair Oil For Amazing Hair Growth: केस वाढतच नसतील तर आता हे एक तेल लावून पाहा.. महिना भरातच केसांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल.. (best solution for fast hair growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 05:49 PM2024-05-10T17:49:52+5:302024-05-10T17:50:44+5:30

Homemade Hair Oil For Amazing Hair Growth: केस वाढतच नसतील तर आता हे एक तेल लावून पाहा.. महिना भरातच केसांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल.. (best solution for fast hair growth)

Home remedies for long hair, homemade hair oil for amazing hair growth, best solution for fast hair growth | केस वाढतच नाहीत? 'हे' जादुई तेल लावा, एवढे लांबसडक होतील की सांभाळणंही कठीण होईल...

केस वाढतच नाहीत? 'हे' जादुई तेल लावा, एवढे लांबसडक होतील की सांभाळणंही कठीण होईल...

Highlightsया तेलाचा नियमितपणे वापर केल्यास केस काही महिन्यांतच अगदी लांबसडक होतील.

हल्ली बऱ्याच मुलींची ही तक्रार असते की त्यांच्या केसांची वाढ व्यवस्थित होतच नाही. केस एवढे हळू हळू वाढतात की केसांची वाढ खुंटल्यासारखीच वाटते. तुमच्या केसांचीही अशीच तक्रार असेल आणि तुम्हाला छान दाट, लांबसडक केस आवडत असतील तर आता इतर सगळे उपाय सोडा आणि हे एक खास घरगुती तेल वापरून पाहा (homemade hair oil for amazing hair growth)... या तेलाचा नियमितपणे वापर केल्यास केस काही महिन्यांतच अगदी लांबसडक होतील. (best solution for fast hair growth)

 

केस वाढतच नसतील तर काय उपाय करावा?

केसांची पटापट वाढ व्हावी, केस छान दाट, लांबसडक व्हावेत यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ thelonghairgirl13 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक लोखंडी कढई गरम करायला ठेवा.

काळवंडलेली मान- गुडघे होतील स्वच्छ, फक्त ३ पदार्थ वापरून करा मसाज, टॅनिंग होईल कमी...

या कढईमध्ये १ टेबलस्पून साजूक तूप टाका. त्यामध्ये मोहरी, तीळ, कलौंजी हे सगळं प्रत्येकी १- १ टेबलस्पून टाका. 

त्यानंतर जास्वंदाची ७ ते ८ वाळलेली फुलं, थोडंसं भृंगराज आणि एक ते दोन वाळलेले आवळे घाला. हे सगळे पदार्थ तुपात व्यवस्थित परतून घ्या.

 

त्यानंतर त्यामध्येच अर्धी वाटी कॅस्टर ऑईल, अर्धी वाटी ऑलिव्ह ऑईल, अर्धी वाटी बदाम तेल आणि १ वाटी कोल्डप्रेस कोकोनट ऑईल टाका. तेल गरम हाेऊन उकळायला लागेल. जेव्हा तेलाचा रंग बदलेल आणि त्यात टाकलेले पदार्थ वाळून कडक होतील तेव्हा गॅस बंद करा.

आपल्या मुलांनी गुणी, समजूतदार व्हावं असं वाटतं ना? मग ५ गोष्टी त्यांना नक्की शिकवा 

तेल गाळून एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपण्यापुर्वी या तेलाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी केस धुवून टाका. काही महिन्यांतच केस खूप छान वाढतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: Home remedies for long hair, homemade hair oil for amazing hair growth, best solution for fast hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.