सध्या केसगळती, केसांची वाढ न होणे किंवा केस तुटण्याच्या समस्येमध्ये अधिक प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.(Home remedies for long and thick hair) खराब जीवनशैली, प्रदूषण आणि ताणतणावाचा आपल्या केसांवर नकारात्मक परिणाम होतो. (Aloe vera for healthy hair growth) अनेकदा महागडे केमिकल उत्पादने वापरुन देखील आपल्याला केसांच्या वाढीत बदल दिसत नाही. केस अधिक रुक्ष-कोरडे होतात. जर आपले केसही कोरडे-रुक्ष होत असतील तर कोरफडीचा गर फायदेशीर ठरेल. (Natural remedies for hair fall and thinning)
कोरफड आपल्या केसांसाठी वरदान आहे. यामध्ये इतर पदार्थ मिसळल्याने केसांना फायदा होतो.(Best ingredients for shiny, thick hair) कमकुवत केस, केसगळती यापासून आपली सुटका होईल. काही घरगुती उपाय केल्यास आपल्या फरक जाणवेल. ज्यामुळे आपले केस लांब, दाट आणि काळेभोर होतील. (Aloe vera gel for dry hair treatment)
सुंदर दिसण्यासाठी रोज काजळ लावताय? 'या'५ चुका टाळा, डोळ्यांचे तेजही हरवेल...
कोरफडीच्या गराचे फायदे
1. कोरफड केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते. तसेच टाळूच्या समस्या दूर करते.
2. कोरफडचा गर केसांची मुळे मजबूत करतात. टाळू हायड्रेट ठेवून केसातील कोंडा कमी करते.
3. प्रोटीओलाइटिक एंजाइम केसांना नवीन ऊर्जा देते. टाळूला होणारी जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करते.
कोरफडीचा गर केसांना कसा लावायचा?
1. कोरफड आणि नारळाचे तेल
२ चमचे कोरफडीच्या गरात १ चमचा खोबऱ्याचे तेल चांगले मिक्स करा. केसांच्या मुळांना लावून ३० मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने धुवा. हे मिश्रण केसांना खोलवर पोषण देते तसेच आद्रर्ता टिकवून ठेवते.
2. कोरफड आणि कांद्याचा रस
२ चमचे कोरफडीच्या गरात २ चमचे कांद्याचा रस मिसळा आणि टाळूवर लावा. २० ते २५ मिनिटांनी शाम्पूने केस धुवा. कांद्याचा रस केसांची वाढ करण्यास मदत करते.
3. कोरफड आणि आवळा पावडर
कोरफडीचा गर २ चमचे आणि १ चमचा आवळा पावडरची पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळूवर लावा. ३० मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवा. आवळा पावडर केसांना चमक देते.
3. कसा कराल वापर?
1. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय करा.
2. कोरफडीचा गर वापरताना तो नेहमी ताजा असायला हवा.
3. हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये हलकेच लावून मालिश केल्यास आराम मिळेल.