Lokmat Sakhi >Beauty > तुटकी-बेजान नखं? पावसाळ्यात त्रास वाढतो? 4 उपाय- नखांची सहज देखभाल

तुटकी-बेजान नखं? पावसाळ्यात त्रास वाढतो? 4 उपाय- नखांची सहज देखभाल

पावसाळ्याच्या दिवसात हाताला केवळ हॅण्ड क्रीम लावून नखांची काळजी (nail care in rainy season) घेतली जाऊ शकत नाही. त्यासाठी विशेष घरगुती उपाय ( home remedy for nail beauty) केल्यास नखांचं सौंदर्य जपलं जातं. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 03:44 PM2022-06-23T15:44:33+5:302022-06-23T15:53:49+5:30

पावसाळ्याच्या दिवसात हाताला केवळ हॅण्ड क्रीम लावून नखांची काळजी (nail care in rainy season) घेतली जाऊ शकत नाही. त्यासाठी विशेष घरगुती उपाय ( home remedy for nail beauty) केल्यास नखांचं सौंदर्य जपलं जातं. 

Home remedies for nail care in rainy season | तुटकी-बेजान नखं? पावसाळ्यात त्रास वाढतो? 4 उपाय- नखांची सहज देखभाल

तुटकी-बेजान नखं? पावसाळ्यात त्रास वाढतो? 4 उपाय- नखांची सहज देखभाल

Highlightsपावसाळ्याच्या आर्द्र हवामानामुळे केवळ नखंच नाही तर नखांच्या आजूबाजूची त्वचा ही खराब होते.  सैंधव मीठ, मध, ऑलिव्ह ऑइल आणि कच्चं दूध याद्वारे नखांचं सौंदर्य जपण्यासाठी घरगुती उपाय करता येतात. 

पावसाळा सुरु झाला की त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. पण त्वचा आणि केसांसोबतच पावसाळ्याच्या दिवसात नखांची काळजी (nail care in rainy season) घेणंही आवश्यक आहे.  पावसाळ्यात नखं कमजोर होतात, नखांच्या आजूबाजूची त्वचा म्हणजेच क्यूटिकल्सही खराब होते. ज्यांना मोठे नखं ठेवण्याची हौस असते त्यांनी तर पावसाळ्याच्या दिवसात नखांची काळजी घ्यायलाच हवी.

Image: Google

पावसाळ्यात आर्द्र हवामानामुळे नखांची चमक हरवते. नखं कमजोर होतात. नखाच्या (nails problem in rainy season)  आजूबाजूची त्वचा नाजूक होते. ही त्वचा कोरडी होवून उलते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात हाताला केवळ हॅण्ड क्रीम लावून नखांची काळजी घेतली जाऊ शकत नाही. नखांची विशेष देखभाल करण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ पूनम चूग यांनी काही घरगुती उपाय (home remedy for nail care in rainy season)  सांगितले आहेत. 

पावसाळ्यात नखांची काळजी घेताना

Image: Google

1. दिवसभर आपले हात सर्वात जास्त काम करतात. त्यामुळे हातांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्यावं . त्यात सैंधव मीठ घालावं. या पाण्यात 10 मिनिटं हात बुडवून ठेवावेत. नंतर हात रुमालानं टिपून घ्यावेत. नंतर हातांना हॅण्ड क्रीम लावावं. या उपायामुळे नखांची आजूबाजूची त्वचा मऊ मुलायम राहाते.

Image: Google

2. पावसाळ्यात नखांची हरवलेली चमक परत येण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा उपयोग होतो. यासाठी ऑलिव्ह आइल थोडं गरम करावं. या तेलानं नखांचा मसाज करावा. मसाज झाल्यानंतर हात पाण्यानं स्वच्छ धुवावेत. नखं खूपच खराब दिसत असतील तर दिवसातून दोन वेळा ऑलिव्ह तेलानं नखांचा मसाज करावा. ऑलिव्ह तेलात टी ट्री  ऑइलचे काही थेंब टाकून या मिश्रणानं नखांचा मसाज केल्यास नखांना चमक येते आणि नखाच्या आजूबाजूची त्वचा ओलसर राहाते.

Image: Google

3. नखाच्या आजूबाजूंची त्वचा अर्थात क्यूटिकल्स खराब होत असतील तर नखांना आणि नखाच्या आजूबाजूच्या त्वचेला मध लावावं. मध लावून 15 मिनिटं ठेवावं. नंतर नखं पाण्यानं धुवून स्वच्छ करावीत. मधामुळे नखाच्या आजूबाजूच्या त्वचेला नैसर्गिक माॅश्चरायझर मिळतं. 

Image: Google

4.  कच्च्या दुधात फॅटी ॲसिड असतं. हे फॅटी ॲसिड नखं आणि नखांच्या आजूबाजूच्या त्वचेसाठी फायदेशीर असतं.  एका भांड्यात कच्चं दूध घेऊन त्यात  बोटं थोडावेळ बुडवून ठेवावीत. रोज रात्री हा उपाय केल्यास पावसाळ्यात नखांचं सौंदर्य आणि आरोग्य जपलं जातं. 

Web Title: Home remedies for nail care in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.