Join us  

गळून गळून केस पातळ झाले? खोबरेल तेलात ३ पदार्थ टाकून लावा- नवे केस भराभर उगवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 11:17 AM

Hair Care Tips For Thin Hair: डोक्यावरचे केस विरळ होऊन भांग पसरत चालला असेल तर हा एक सोपा उपाय लगेच करून पाहा. (how to control hair loss)

ठळक मुद्देआठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय करून पाहा. अगदी काही दिवसांतच केस गळणं कमी झालेलं आणि डोक्यावर नवे केस उगवलेलं दिसून येईल. 

आहारातून पुरेसं पोषण मिळालं नाही तर केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. याशिवाय आपल्या केसांना नेहमीच प्रदुषण, ऊन, कॉस्मेटिक्सचा मारा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळेही केस गळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते. केसांना योग्यप्रकारे पोषण देणं हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. यासाठी आपण आहारातही काही पदार्थ आवर्जून घेतले पाहिजेत आणि केसांच्या मुळाशीही काही पदार्थ लावून मसाज केली पाहिजे (home remedies for reducing hair fall). ते पदार्थ नेमके कोणते आणि कशा पद्धतीने ते वापरायचे याविषयी ही खास माहिती.. (how to control hair loss)

 

नवे केस भराभर उगविण्यासाठी उपाय

नवे केस उगवण्याचं प्रमाण वाढलं आणि केस गळणं कमी झालं की आपोआपच तुमचे केस दाट दिसू लागतील. यासाठी नेमका काय उपाय करायचा, याविषयीचा व्हिडिओ sarikazbeautytips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

लाल मुंग्यांनी घरात उच्छाद मांडला? किचनमधला 'हा' पदार्थ चिमूटभर वापरा- घरातून मुंग्या गायब

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडिपत्त्याची १५ ते २० पाने, कोरफडीचे थोडे तुकडे आणि १ टेबलस्पून पांढरे तीळ असं साहित्य लागणार आहे. पांढऱ्या तिळाऐवजी काळे तीळ असतील तरी चालेल. हे सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्या. 

 

यानंतर एका वाटीमध्ये २ चमचे खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेलामध्ये एक चमचा बदाम तेल टाकल्यास आणखी उत्तम. या तेलामध्ये आता आपण बारीक केलेलं कडिपत्ता, कोरफड आणि तिळाचं वाटण टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

जेवताना ३ चुका करता म्हणून ते पचत नाही, वेटलॉस करायचा तर वाचा आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला

आता हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावा आणि हळूवार हाताने मसाज करा. यानंतर साधारण २ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय करून पाहा. अगदी काही दिवसांतच केस गळणं कमी झालेलं आणि डोक्यावर नवे केस उगवलेलं दिसून येईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी