Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांखालची काळी वर्तूळं घालविण्याची सोपी ट्रिक, फक्त ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय

डोळ्यांखालची काळी वर्तूळं घालविण्याची सोपी ट्रिक, फक्त ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय

How To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांखाली काळी वर्तूळं झाली असतील तर ती घालविण्यासाठी हा एक साेपा उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2024 05:56 PM2024-02-03T17:56:57+5:302024-02-03T17:57:37+5:30

How To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांखाली काळी वर्तूळं झाली असतील तर ती घालविण्यासाठी हा एक साेपा उपाय करून पाहा...

Home remedies for removing dark circles, How to get rid of dark circles? | डोळ्यांखालची काळी वर्तूळं घालविण्याची सोपी ट्रिक, फक्त ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय

डोळ्यांखालची काळी वर्तूळं घालविण्याची सोपी ट्रिक, फक्त ३ पदार्थ वापरून करा सोपा उपाय

Highlightsआठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करावा. यामुळे महिना भरातच डोळ्यांखालची काळी वर्तूळं बऱ्याच प्रमाणात कमी होतील.

काही जणींच्या डोळ्याखाली खूप जास्त काळं झालेलं असतं. त्यालाच आपण डार्क सर्कल्स असंही म्हणतो. या डार्कसर्कल्समुळे चेहरा खूपच अशक्त झाल्यासारखा, आजारी असल्यासारखा वाटतो. खासकरून जेव्हा आपण आयब्रोज किंवा थ्रेडिंग करतो, तेव्हा तर डाेळ्यांखालची काळी वर्तूळं आणखीनच स्पष्ट दिसू लागतात. हे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काेणता घरगुती उपाय करायचा ते आता पाहूया (Home remedies for removing dark circles).. हा उपाय अतिशय सोपा आहे. शिवाय तो करण्यासाठी आपण सगळे घरगुती पदार्थच वापरणार आहोत. हा उपाय नियमितपणे केल्यास महिनाभरातच डार्क सर्कल्स कमी होतील. (How to get rid of dark circles?)

 

डोळ्यांखाली काळी वर्तूळं येण्याची कारणं

१. आहारातून पुरेशी पोषणमुल्ये मिळाली नाहीत, तर डोळ्यांखाली काही वर्तूळं येतात. डोळ्याखाली काळी वर्तूळं येणं हा एक प्रकारचा अशक्तपणाच आहे.

२. जे लोक रात्री अंधारात स्क्रिन बघतात, त्यांनाही डार्क सर्कल्सचा त्रास होतो.

स्नेक प्लांट घरात असण्याचे ३ जबरदस्त फायदे, एखादं तरी स्नेक प्लांट आपल्याकडे असावंच, कारण......

३. रात्रीची जागरणं खूप होत असतील, झोप पुर्ण होत नसेल तरीही डोळ्यांखाली काही वर्तूळं येतात.

४. पाणी कमी प्रमाणात पित असाल तरीही हा त्रास होऊ शकतो. 

 

डोळ्यांखालची काळी वर्तूळं काढून टाकण्याचा उपाय

डोळ्यांखालची काही वर्तूळं काढून टाकण्यासाठी काय उपाय करावा, या विषयीचा व्हिडिओ beautybychitwan या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टीस्पून कॉफी पावडर, चिमूटभर हळद आणि ॲलोव्हेरा जेल लागणार आहे.

तुम्ही घेतलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान? लसणाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

एका वाटीत हे तिन्ही पदार्थ एकत्र करून घ्या. यानंतर डोळ्यांभोवती हा लेप लावा.

१० मिनिटांनी हा लेप हळूवार धुवून टाका. 

आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करावा. यामुळे महिना भरातच डोळ्यांखालची काळी वर्तूळं बऱ्याच प्रमाणात कमी होतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

 

Web Title: Home remedies for removing dark circles, How to get rid of dark circles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.