बऱ्याच जणींच्या बाबतीत असं आढळून येतं की चेहरा, मान, हात यांच्या तुलनेत त्यांच्या तळहाताची मागची बाजू खूपच काळवंडलेली असते आणि तळहातांचा मऊपणा जाऊन ते खूपच रखरखीत झालेले असतात. एकतर आपलं तळहातांकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि दुसरं म्हणजे तळहात अधिकाधिक प्रमाणात कामात असतात. त्यामुळे काम करताना त्यांना शरीराच्या इतर भागांपेक्षा धूळ, साबण, पाणी यांचा सतत सामना करावा लागतो. त्यामुळे तळहाताच्या मागची बाजू काळवंडते आणि तळहात रखरखीत होतात (Home remedies for soft palm). तळहाताची ही समस्या अवघ्या काही मिनिटांतच सोडवायची असेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to get manicure like effect at home?)
तळहाताची मागची बाजू काळवंडली असेल तर उपाय
(Hand mask for soft and hydrated hands)
तळहाताची मागची बाजू काळवंडली असेल किंवा तळहात खूपच रखरखीत झाले असतील, तर कोणता उपाय करावा, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ akankshaa_rana_ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय केल्यानंतर आपल्याला हातांवर मॅनिक्युअर केल्यासारखा परिणाम जाणवेल.
व्हॅलेन्टाईन्स डे ला स्पेशल दिसायचंय? बॉलीवूड सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स- करा एकदम 'किलर' लूक
हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल, १ टी स्पून ॲलोव्हेरा जेल, १ टीस्पून खोबरेल तेल, १ टीस्पून मध लागणार आहे.
हे सगळं मिश्रण एका वाटीत घेऊन एकत्र करा.
यानंतर या मिश्रणाने तळहातांना तसेच तळहातांच्या मागच्या बाजुला ५ ते ७ मिनिटे चोळून चांगली मालिश करा.
हातांना मालिश करून झाल्यानंतर दोन्ही हातांमध्ये प्लास्टिकची पिशवी घाला आणि १० ते १५ मिनिटांसाठी दोन्ही हात तसेच पिशवीत ठेवा.
आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं करण्याची चटपटीत रेसिपी- एकदा चाखून बघाच ही न्यारी चव
यानंतर हातातल्या पिशव्या काढा आणि काेमट पाण्याने हात धुवून घ्या.
हा उपाय केल्यानंतर तळहाताच्या मागच्या बाजुचं टॅनिंग निघून जाईल. डेड स्किन निघून जाईल आणि तळहात मऊ- कोमल होतील.