Join us  

मान- पाठ खूपच काळवंडली? टॅनिंग कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरा, त्वचा छान उजळेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 2:02 PM

How To Get Rid Of Tanning On Back Neck: बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट घरच्याघरीच मिळेल. करून पाहा हा एक सोपा घरगुती उपाय (home remedies)....

ठळक मुद्देहा उपाय केल्यानंतर अगदी बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल

चेहरा, हात यांची काळजी आपण व्यवस्थित घेतो. कारण शरीराचे हे भाग आपले आपल्यालाच रोजच्या रोज दिसत असल्याने आपण त्यांना चटकन स्वच्छ करतो. पण पाठ, मान यांच्याकडे जरा दुर्लक्षच होतं. म्हणून मग शरीराच्या इतर भागांपेक्षा मान- पाठ टॅन होऊन जरा जास्तच काळवंडलेली दिसते (Home remedies for tanning on back neck). मग काळवंडलेली मान- पाठ स्वच्छ करणं थोडं कठीण होऊन जातं. त्यामुळे आता हा एक सोपा उपाय करून पाहा. घरातलेच काही पदार्थ वापरून आपल्याला एक लेप तयार करायचा आहे (How to clean back neck?). हा उपाय केल्यानंतर अगदी बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल (Body polishing effect in just 10 rupees at home)... 

 

मान आणि पाठीवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या beautywithsunanda0795 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

बटाटे चिरल्यानंतर पाण्यात का भिजवावे? आणि किती वेळ? बघा काय आहे त्यामागचं वैज्ञानिक कारण

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून भात, अर्ध्या बटाट्याच्या फोडी आणि २ टेबलस्पून कच्चं दूध असं साहित्य लागणार आहे.

सगळ्यात आधी वरील सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

 

त्यानंतर ही पेस्ट गाळून घ्या. आता जे गाळलेलं पाणी असेल त्यात १ टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि थोडं खोबरेल तेल टाका.

हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करा आणि ते काळवंडलेल्या मानेला, पाठीला चोळून लावा.

सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

साधारण २ ते ३ मिनिटे व्यवस्थित चोळा आणि त्यानंतर मग १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. 

हा उपाय तुम्ही टॅन झालेल्या हातांवर आणि पायांवरही करू शकता. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी