हल्ली केसांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. कमी वयात केस पांढरे (gray hair) होणं, केस खूप जास्त गळू लागणं, केसांमध्ये वारंवार कोंडा (dandruff) होणं, यापैकी कोणता ना कोणता त्रास दर ५ व्यक्तींपैकी एकाला जाणवत आहे. यासाठी आपलं बदललेलं रुटीन, आहार (diet) या सगळ्या गोष्टी जितक्या कारणीभूत आहेत, तितकंच कारणीभूत आहे आपल्या आजूबाजुला असणारं प्रदुषण. प्रदुषणाचा परिणाम स्काल्पवर होतो. आणि स्काल्पला होणारं इन्फेक्शन केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी निर्माण करतं. त्यामुळे सगळ्यात आधी तर स्काल्पचं आरोग्य सुधारण्याकडे भर देणं गरजेचं आहे. यासाठी पेरुच्या पानांचा हा खास वापर करून पहा. पेरुच्या पानांमुळे (Benefits Of Guava Leaves For Hair) केसांची मुळं मजबूत होतील आणि केस गळणं (hair fall) कमी होईल.
पेरूच्या पानांचे केसांसाठी फायदे
Benefits of guava leaves for hair thickness
१. पेरूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल घटक असतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी त्याची निश्चितच मदत होते.
२. पेरुप्रमाणेच पेरुच्या पानांमध्येही मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असतं. हे कॅल्शियम केसांसाठी पोषक ठरतं. त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केसांची चांगली वाढ होते.
३. पेरुच्या पानांमध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याचा फायदा स्काल्पची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यावर होतो. पीएच लेव्हल संतुलित राहिल्यास आपोआपच केसांतील कोंड्याचं प्रमाण कमी होतं.
पेरुच्या पानांचा केसांसाठी असा करा वापर
- पेरुच्या पानांचा केसांसाठी कसा वापर करायचा याची माहिती इन्स्टाग्रामच्या beautyandhairsecrets या पेजवर शेअर करण्यात आली आहे. हा उपाय नियमितपणे करून बघितल्यास केसांची मुळे पक्की होऊन त्यांची वाढ अधिक चांगली होती. केसांची जाडी वाढण्यास मदत होते, असे सांगण्यात आले आहे.
- हा उपाय करण्यासाठी पेरुची ताजी पाने, दही, खोबरेल तेल आणि कढीपत्ता असे साहित्य लागणार आहे.
- सगळ्यात आधी पेरुची ५ ते ६ पाने स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरमधे पेरुची पाने, कढीपत्त्याची ८ ते १० पाने, १ टेबलस्पून दही आणि एक टेबलस्पून खोबरेल तेल टाका.
- हे सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला लावून हलक्या हाताने मसाज करा.
- २ ते अडीच तास हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर तसेच राहू द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू लावून केस धुवून टाका.
- अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी एक- दोन महिने नियमितपणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.