Lokmat Sakhi >Beauty > एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर

एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर

Home Remedies For Under Eye Wrinkles And Dark Circles डार्क सर्कलमुळे चेहऱ्याची रंगत कमी झाली? एक चमचा दह्याचा करा असा वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2023 07:14 PM2023-07-09T19:14:08+5:302023-07-09T19:14:48+5:30

Home Remedies For Under Eye Wrinkles And Dark Circles डार्क सर्कलमुळे चेहऱ्याची रंगत कमी झाली? एक चमचा दह्याचा करा असा वापर..

Home Remedies For Under Eye Wrinkles And Dark Circles | एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर

एक चमचा दह्यात मिसळा फक्त एक गोष्ट, डार्क सर्कल होतील कमी, डोळे दिसतील सुंदर

डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होणं म्हणजे मोठी सौंदर्य समस्या. डार्क सर्कल अनेक कारणांमुळे तयार होतात. बिघडलेली जीवनशैली, स्क्रीन टायमिंग वाढणे, अपुरी झोप या कारणांमुळे डार्क सर्कल वाढतात, परंतु, डार्क सर्कल लवकर देखील जात नाही. काही लोकं कॉस्मेटिक उपाय तर, काही नैसर्गिक उपाय करून पाहतात.

कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समुळे स्किन खराब होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, नैसर्गिक उपायांनी देखील डार्क सर्कल कमी होऊ शकते, यासाठी आपण दह्याचा वापर करू शकता. दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. यासाठी दह्याचा वापर कसा करावा हे पाहूयात(Home Remedies For Under Eye Wrinkles And Dark Circles).

दही

एका वाटीत एक चमचा दही घ्या, त्यात एक चमचा कॉफी घालून मिक्स करा. ही पेस्ट ब्रशने डोळ्यांखाली लावा. १५ मिनिटानंतर डोळे थंड पाण्याने धुवा. जो पर्यंत डार्क सर्कल कमी होत नाही, तोपर्यंत यापेस्टचा वापर करा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून एक वेळा करू शकता.

केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

ग्रीन - टी

डोळ्यांखालील काळपटपणा दूर करण्यासाठी ग्रीन टी बॅगचा वापर करा. यासाठी ग्रीन टी बॅग पाण्यात घालून चहा तयार करा. व ग्रीन टी बॅग फ्रिजमध्ये ठेवा, व ही ग्रीन टी बॅग १० मिनिटांसाठी डोळ्यांखाली ठेवा. काही वेळेनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

खोबरेल तेल रात्री लावा, सकाळी पहा जादू, पिवळे दात ते तुटकी नखे - समस्या गायब

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस काळी वर्तुळे दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. डार्क सर्कल कमी करण्यासाठी एका वाटीत बटाट्याचा रस घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळून डार्क सर्कलवर लावा. व १० मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आपण लिंबाच्या रसाऐवजी कोरफड जेल देखील वापरू शकता.

Web Title: Home Remedies For Under Eye Wrinkles And Dark Circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.