कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. कारण प्रत्येकाचीच जीवनशैली बदलली आहे. आहारातून केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. शिवाय वेगवेगळे कॉस्मेटिक्सही केसांवर नेहमीच ट्राय केले जातात. शिवाय धूळ, धूर, प्रदुषण यांचा सामनाही केसांना नेहमीच करावा लागतो (How to get rid of gray hair). याच्या एकत्रित परिणामामुळे केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत (1 amazing solution for gray hair problem). केस आणखी पांढरे होऊ नयेत शिवाय जे केस पांढरे झाले आहेत ते देखील नैसर्गिकपणे काळे व्हावे, यासाठीचा एक सोपा उपाय बघा...(Use of curry leaves for gray hair)
केस पांढरे होऊ नयेत म्हणून उपाय
केस पांढरे होऊ नयेत किंवा जे केस पांढरे आहेत ते नैसर्गिक पद्धतीने कसे काळे करावेत, याविषयीचा एक सोपा उपाय anandkrishnathakurji या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
कित्येक वर्षांपासून जुनाच तिखट- मीठाचा डबा वापरता? करा थोडासा बदल- बघा ३ सुंदर आकर्षक पर्याय...
यामध्ये जो उपाय सांगितला आहे तो उपाय करायला अगदी सोपा असून त्यासाठी फक्त कडिपत्ता आणि खोबरेल तेल हे दोन पदार्थ लागणार आहेत.
वजन भराभर कमी करायचंय? मग 'ही' फळं अगदी आतापासूनच दररोज खा, झर्रकन उतरेल वजन
हा उपाय करण्यासाठी अर्धा कप कडिपत्ता आणि १ कप खोबरेल तेल एकत्रितपणे एका पातेल्यात टाकून गॅसवर उकळायला ठेवा.
काही वेळाने तेल जेव्हा खूप उकळेल तेव्हा ते काळं पडेल. तेल काळं पडू लागलं की मग गॅस बंद करा.
हे मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हा या तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करा तसेच केसांच्या लांबीवरही हे तेल लावा.
नाश्त्यासाठी करून पाहा स्वीटकॉर्न पराठा! खमंग, कुरकुरीत- चवदार, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम
१ ते २ तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्याने केस कधीच पांढरे होणार नाहीत, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. प्रयोग करायला सोपा आहे, शिवाय कडिपत्ता आणि तेल हे नेहमीचेच पदार्थ असल्याने केसांचं नुकसान होणार नाही. त्यामुळे करून पाहायला हरकत नाही.