Join us  

चेहरा गोरा पण मान-पाठ खूपच काळपट दिसते? ४ उपाय, संपूर्ण शरीराचं टॅनिंग होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 4:11 PM

Home remedies to Clean Black Neck : कोरफडीच्या मदतीने तुम्ही काळ्या मान स्वच्छ करू शकता.

जर चेहऱ्याची त्वचा चांगली असेल आणि मान काळी पडली असेल तर तुमच्या सौंदर्यावर याचा परिणाम होऊ शकतो. सन एक्सपोजर, प्रदुषण यांमुळे त्वचेवर काळे पॅचेस येतात.  स्किन केअर रुटीनच्या अभावानं मान काळपट पडते. साध्या स्किन केअर टिप्स वापरून तुम्ही काळपट मानेची समस्या सोडवू शकता. (Home remedies to clean black neck in few minutes use potatocurd oats orange peels aloe vera)

बटाटा

बटाट्यात  नॅच्यूरल स्किन लाईटनिंग तत्व असतात. यामुळे मानेचा काळपटपणा दूर होऊ शकतो. याच्या मदतीने तुम्ही उन्हामुळे काळी झालेली मान देखील स्वच्छ करू शकता. यासाठी बटाट्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस टाकून मानेवर लावा. 15 मिनिटांनंतर त्वचा धुवा. फरक दिसून येईल. (Home remedies to Clean Black Neck)

ओट्स

ओट्समध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. हे त्वचा स्वच्छ आणि मऊ करण्यास मदत करतात. दोन चमचे ओट्स  बारीक करून त्यात टोमॅटोचा रस घाला. आता ते त्वचेवर लावा. हळूहळू तुमची त्वचा स्वच्छ होईल. 

संत्र्याचे साल

संत्र्याच्या सालीमध्ये त्वचा पांढरे करण्याचे गुणधर्म देखील असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता. संत्र्याची साल दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता ते काळ्या मानेवर चांगले लावा. 15 मिनिटांनंतर तुम्ही ते धुवा. त्वचा स्वच्छ होण्यास सुरवात होईल.

कोरफड

कोरफडीच्या मदतीने तुम्ही काळ्या मानेलाही स्वच्छ करू शकता. त्यात एलोइन डिपिग्मेंटिंग आढळते ज्यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. कोरफडीचा गर घेऊन  ताजे जेल काढा. 15 मिनिटांनंतर ते धुवा. त्वचा रात्रभर तशीच राहूद्या आणि सकाळी धुवा. यामुळे त्वचेवर  ग्लो येण्यास मदत होईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स