प्रदूषण, खाण्यापिण्यात पोषणाचा अभाव, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. (Hair Care Tips) केस पांढरे झाले की सतत मेहेंदी किंवा डाय लावून हे केस लपवावे लागतात. (Pandhare Kes Upay) केस पांढरे होऊ नयेत म्हणून बाजारात अनेक शॅम्पू, तेल उपलब्ध आहेत. पण यामुळे केसांवर तात्पुरता परिणाम दिसून येतो. दीर्घकाळ केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यासाठी घरगुती उपायच फायदेशीर ठरतात. (Home Remedies To Darken Hair)
पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक उपाय आहेत. घरगुती उपाय कधीही उत्तम ठरतात. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला खर्चही करावा लागत नाही. डॉ. श्री सोहम यांच्यामते पांढरे केस काळे करण्यासाठी नारळाचे तेल आणि आवळ्याची पावडर हे प्रभावी उपाय आहेत. हा उपाय करण्यासाठी २ मोठे चमचे नारळाचे तेल घ्या. त्यात १ चमचा आवळ्याची पावडर घाला. मंद आचेवर आवळा पावडर आणि तेलाचे मिश्रण उकळून घ्या. (How to get black Hairs Naturally)
हे तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करून घ्या. त्यानंतर एका कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळांना हे तेल लावा आणि केसांची मसाज करा. रोज या तेलाचा वापर करून केसांची मसाज करा कारण फक्त एकदा वापरल्याने केसांवर परिणाम दिसून येणार नाही. नियमित या तेलाने मसाज केल्यास केस चांगले राहण्यास मदत होईल.
दिवसरात्र गळून केस विरळ झाले? जास्वंदाच्या फुलाचा जादूई उपाय, विंचरायचा कंटाळा येईल इतके वाढतील केस
नारळाच्या तेलात आवळा मिसळून लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. यामुळे केसांमध्ये कोलोजन वाढण्याचे प्रमाण जास्त होते. यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. नारळाचे तेल आणि मेहेंदीसुद्धा केसांना लावू शकता. यामुळे मेहेंदी केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि केस काळे राहतील.
शाहरूखनं सांगितलं बाऊंसी-दाट केसांचं सिक्रेट; काळ्या केसांसाठी वापरतो किचनमधले हे ३ पदार्थ
हा उपाय करण्यासाठी नारळाचे तेल उकळून त्यात मेहेंदीची पानं घाला. तेल व्यवस्थित उकळ्यानंतर गॅस बंद करा. नंतर थंड करून हे तेल केसांना लावा. ४० ते ५० मिनिटं तसंच ठेवून केसांची मसाज करा नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. या उपायाने केस काळेभोर राहण्यास मदत होईल.