हिवाळ्यात थंड हवेचा त्वचेवर खूप परिणाम होतो. त्वचा कोरडी पडते, खूप टॅनिंगही होतं. यामुळे मग त्वचा खराब दिसू लागते. म्हणूनच त्वचेची कमी झालेली चमक पुन्हा आणण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असते. अशावेळी आपण सरळ पार्लर गाठतो आणि महागडे फेशियल करून येतो. पण वारंवार पार्लरमध्ये जाणं शक्य नसेल किंवा पार्लरमध्ये जाऊन तेवढे पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (Home remedies to get golden facial like glow). आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा (How to do golden facial at home). बघा तुमचा चेहरा नेहमीच कसा गोल्ड फेशियल केल्याप्रमाणे चमकेल (Golden facial like glow in just 5 minutes)...
गोल्ड फेशियलसारखा ग्लो देणारा सोपा घरगुती उपाय
हा उपाय praveenkkitchen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टीस्पून हरबरा डाळीचं पीठ किंवा बेसन, २ टी स्पून कच्चं दूध, १ टीस्पून गुलाबजल आणि चिमूटभर हळद एवढं साहित्य लागणार आहे.
सानिया मिर्झा म्हणते ८ वर्षांची असताना मला सगळे म्हणायचे- "तुझं लग्न होणार नाही, कारण....."
हे सगळं साहित्य एका वाटीत एकत्र करा आणि त्याची चांगली पेस्ट करून घ्या.
आता चेहरा थोडा ओला करा आणि त्यावर हा लेप लावा. १० ते १२ मिनिटांसाठी तो लेप त्वचेवर राहू द्या.
त्यानंतर हळूवार हाताने चोळून लेप काढून टाका. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवनू घ्या आणि मॉईश्चरायझर लावा.
हा उपाय केल्याने मिळणारे फायदे
१. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे केल्यास चेहऱ्यावर नेहमीच गोल्ड फेशियलसारखी चमक दिसून येईल.
चष्मा असो की नसो- मुलांना ५ पदार्थ खायला द्या- डोळ्यांची ताकद वाढेल, नजर होईल तेज
२. चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.
३. त्वचेवरचं टॅनिंग निघून गेल्यामुळे त्वचा उजळ वाटेल.
४. चेहऱ्यावरचे अतिरिक्त केसही हळूहळू कमी होतील.